Western Ghat Biodiversity Crisis esakal
कोल्हापूर

Biodiversity Crisis : पश्‍चिम घाटातली जैवविविधता संकटात! डोंगरावर वणवे लावून ऊस शेतीचा फंडा; कीटक, पक्ष्यांच्या अधिवासावर घाला

पश्‍चिम घाटातील सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर रांगांवरील हवामान ऊस पिकाला अनुकूल नाही.

संदीप खांडेकर, सदानंद पाटील

'घाटावरील वनसंपदा नष्ट करून तेथे शेती केली जात असेल, तर त्याचा निश्‍चित पर्यावरणावर वाईट परिणाम होणार आहे.'

कोल्हापूर : जैवविविधतेचा (Western Ghat Biodiversity Crisis) कसलाही विचार न करता गगनबावडा तालुक्यातील (Gaganbawda Ghat) संवेदनशील क्षेत्रात मोडणाऱ्या डोंगरांवर वणवे लावून टेरेस शेती केली जात आहे. साळवण फाट्यावरून निवडेतून कोदे धरणाकडे जाताना ठिकठिकाणी वणवे लागल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

भात, नाचणी व भुईमूग या तेथील पारंपरिक पिकांना फाटा देत ऊस शेतीचे प्रमाण वाढत असल्याचे कृषी विभागाचा (Agriculture Department) अहवाल सांगतो. या बदलत्या पीक पद्धतीमुळे तेथील मूळ वनस्पती, कीटक व पक्ष्यांच्या अधिवासावर घाला घातला जात आहे. जैवविविधतेसाठी ते अत्यंत घातक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कळे ते गगनबावडा मार्गावर सांगशी, सैतवडे, पळसंबे, असळज, खोकुर्ले, शेणवडे, मांडुकली, मार्गेवाडी, साळवण, निवडे, खांडुळे, परखंदळे ही गावे. मणदूर, अणदूर ते ठिकठिकाणच्या गावांत डोंगर माथ्यांवर टेरेस शेती वाढू लागली आहे. पायऱ्यांची,‌ मजगी अथवा खाचरांची शेती म्हणून सुरुवातीची तीन वर्षे भात पीक घेऊन पुढे सर्रास ऊस शेती (Sugarcane Farming) केली जात आहे.

Western Ghat Biodiversity Crisis

कृषी विभागाकडून टेरेस शेतीला अनुदान दिले जात असल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा वाढत आहे. २०२१-२२ ला तालुक्यातील २० हेक्टर क्षेत्रात टेरेस शेती करण्यासाठी प्रस्ताव मंजूर झाले. कोदे धरणाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूकडील डोंगरांवरून धुराचे लोट दिसत होते, पुढील शेतीसाठीची ती तयारीच सुरू होती. त्या उंच डोंगरांवर ऊस शेती पर्यायी पीक म्हणून केली जात आहे.

कोदे धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर थांबून शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यावर शिक्कामोर्तब झाले. गव्यांचा कळप भात, नाचणी, भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे, ऊस शेतीकडे वळल्याचे शेतकरी सांगतात; पण त्यातून संवेदनशील क्षेत्रातील जैवविविधतेला मोठा धक्का लागतोय हे त्यांच्या गावीही नाही.

कृषी अधिकारी रमेश गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना भात शेतीला अनुदानापोटी ५४ हजार रुपये दिले जातात. केवळ फायदेशीर पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस शेतीसाठी आहे. ही शेती करण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. योजनेचा फायदा उठवताना दोन-तीन वर्षे भात शेती करून ऊस शेतीकडे वळण्याचा ट्रेंड वाढत आहे. उसाला उतारा कमी का असेना, करेन तर ऊसशेती अशी मानसिकता रुजू लागली आहे आणि ती घातक आहे.

पश्‍चिम घाटातील सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर रांगांवरील हवामान ऊस पिकाला अनुकूल नाही. तरीही घाटावरील वनसंपदा नष्ट करून तेथे शेती केली जात असेल, तर त्याचा निश्‍चित पर्यावरणावर वाईट परिणाम होणार. तेथील दुर्मिळ वृक्ष, पक्षी, प्राणी व कीटकांचा अधिवासच नष्ट होतील.

- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT