Shahu Maharaj_Sharad Pawar 
कोल्हापूर

Sharad Pawar: शाहू महाराजांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देणार का?; शरद पवार म्हणाले...

राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देणार का? या प्रश्नाला उत्तर दिलं. यावेळी काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या. (will shahu maharaj chhatrapati be nominated for lok sabha from Kolhapur sharad Pawar gives answer)

शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा होती की त्यांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, मी इतकं वर्षे इथं येतोय पण कोणी माझ्या कानावर हे घातलं नाही. तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो की याबाबत मी एकट्यानं निर्णय घ्यायचा मला अधिकार नाही.

कारण आमची आघाडी आहे. यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामुळं जागांसंबंधिची निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. मी यावर माझ्याही सहकार्यांशी अद्याप चर्चा केलेली नाही. (Latest Marathi News)

तुम्ही मला व्यक्तिगतरित्या विचारत असाल तर माझ्या सर्व सहकाऱ्यांची यासंदर्भात सूचना असेल तर त्याचा मला आनंदच आहे. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. आज इथ आल्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला त्यांच्याकडून थोडा विलंब झाला. मला आश्चर्य वाटलं असं कधी होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT