Witchcraft Case esakal
कोल्हापूर

Kolhapur : घरातून भूतपिशाच्च घालवतो सांगून कोल्हापुरात वृद्धाला 85 लाखांचा गंडा; भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे बनले धोकादायक

Gangavesh Kolhapur : फिर्यादी सुभाष कुलकर्णी यांची नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे वडिलार्जित शेतजमीन व घर आहे. ते सध्या पत्नी, मुलासोबत गंगावेश येथे राहण्यास आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भूतपिशाच्च घालविण्यासाठी घरातून गाडगे फिरवणे, सोन्याचा नाग बनविणे, चंद्रसूर्य ज्योत, सोन्याचे कासव बनविणे, पिंपळाचे पान बनविणे अशी कारणे सांगून रक्कम उकळली.

कोल्हापूर : काळी जादू आणि करणी काढण्याची बतावणी करत गंगावेश येथील वृद्धाला ८४ लाख ६९ हजारांचा गंडा घालण्यात आला. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या वर्षभराच्या कालावधीत गंगावेश तसेच कणकवली अशा ठिकाणी पूजा मांडून पैसे उकळण्यात आले. याबाबत सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. दत्त गल्ली, गंगावेश) यांनी फिर्याद राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) दिली आहे.

वेगवेगळ्या पूजा, गृह शुद्धीकरणातून जमिनीचे प्रलंबित निकाल, कौटुंबिक समस्या मार्गी लावण्याचे भासवून ४९ तोळे दागिने, पावणेतीन लाखांचे चांदीचे अलंकार, रोख व बॅंक खात्यावरील ५४ लाख ८४ हजारांची रक्कम, दोन लाखांचे लाकडी साहित्य व प्रापंचिक वस्तू अशी सुमारे ८४ लाख ६९ हजारांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी भोंदू दादा पाटील महाराज (पाटणकर), अण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर (सर्व रत्नागिरी), श्री. गोळे (रा. बारामती), कुंडलिक झगडे (रा. जेजुरी), तृप्ती मुळीक (रा. कणकवली), ओंकार, भरत, हरीश (पूर्ण नावे व पत्ता समजू शकलेला नाही) अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादी सुभाष कुलकर्णी यांची नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे वडिलार्जित शेतजमीन व घर आहे. ते सध्या पत्नी, मुलासोबत गंगावेश येथे राहण्यास आहेत. गावाकडील जमिनीबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. इतर काही कौटुंबिक अडचणींमुळे ते चितेंत होते. त्यांच्याच मावसभावाने या समस्येतून सुटका होण्यासाठी बारामतीच्या गोळे नावाच्या व्यक्तीला भेटण्याची गळ घातली.

त्यानंतर गोळे कुंडलिक झगडे नावाच्या साथीदाराला घेऊन कुलकर्णी यांच्या घरी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी आला. गोळेने झगडे जेजुरी देवस्थानचा पुजारी असल्याची माहिती यावेळी दिली. तुमचे न्यायालयीन वाद, मुलाच्या लग्नाची समस्या दूर करण्यासाठी पाटील महाराज यांना भेटूया. ते सर्व समस्यांचे निराकरण करतील, असे सांगत कुलकर्णी यांचा विश्वास संपादन केला.

काळी जादू केल्याची बतावणी...

फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयित पाटील महाराज व त्याचे पाच साथीदार कुलकर्णी यांच्या घरात आले. नणुंद्रे गावातील काही जणांनी काळी जादू करून तुमच्या घरच्यांवर करणी केल्याची बतावणी पाटील याने केली. कुलकर्णी यांना कणकवली येथे संशयित तृप्ती मुळीक हिच्या घरी नेण्यात आले. मुळीक पोलिस असल्याचेही संशयितांनी कुलकर्णी यांना भासवले. फेब्रुवारीच्या अखेरीस पाटील यांच्या घरी पूजा मांडून रोख ११ हजार रुपये घेतले. पूजा सात दिवस करायची असल्याचे सांगून सात हजार रुपये, शापित बंध काढण्यासाठी ४० हजार रुपये घेतले.

रक्कम खात्यांवर वळवली...

भूतपिशाच्च घालविण्यासाठी घरातून गाडगे फिरवणे, सोन्याचा नाग बनविणे, चंद्रसूर्य ज्योत, सोन्याचे कासव बनविणे, पिंपळाचे पान बनविणे अशी कारणे सांगून रक्कम उकळली. धनश्री काळभोर हिने वेगवेगळ्या बॅंक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले आणि सुमारे ५४ लाख ८४ हजार रुपये उकळले. यासह ४९ तोळे सोने, दोन लाख ८० हजारांचे चांदीचे अलंकार व वस्तू, दोन लाखांचे लाकडी साहित्य आणि बंदूक अशी एकूण ८४ लाख ६९ हजारांची फसवणूक झाली.

भूत, भानामती, चेटूक, अघोरी प्रकार फोल आहेत. अवैज्ञानिक गोष्टी दाखवून लोकांना फसवले जाते. भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे धोकादायक असते. त्यातून आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागतो. लोकांनी चिकित्सकपणे अशा बाबींकडे पाहणे गरजेचे आहे. भानामतीसारखे प्रकार खोटे असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या मदतीसाठी तत्पर आहे.

-सीमा पाटील, राज्य सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सोने, चांदीच्या ऐवजावर डल्ला...

घरातील अनेक वस्तूंवर काळी जादू करण्यात आली असून, त्यांचे शुद्धीकरण करावे लागेल असे सांगून कुलकर्णी यांच्या घरातील साहित्य नेण्यास सुरुवात केली. ८ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत बंदूक, चांदीचा पान डबा, चांदीची ताफी, चांदीची नाणी, सोन्याचा चपलाहार, नोती, कंबर पट्टा, देवाचे टाक, चांदीचे ताट, सोन्याचे तोडे, पितळी हांडे, जुनी भांडी, सागवानी कपाटे, जुने ग्रंथ, लाकडी खुर्च्या असे साहित्य टेम्पोत भरून नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT