नागाव (कोल्हापूर) : वडिलांच्या मोटारसायकलवरून लग्न समारंभासाठी निघालेली महिला ट्रकच्या धडकेत ठार झाली. सुमित्रा मोहन पुदाले ( वय ३०, रा. कोरेगाव, ता. वाळवा, जि. कोल्हापूर ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामध्ये तनिष्का पुदाले ( ५ ) आणि रामचंद्र बाबू पवार ( वय ६०, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर ) हे दोघे जखमी आहेत. पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप - कासारवाडी फाटा येथे आज दुपारी साडे बारा वाजता हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रामचंद्र पवार हे भावकीतील लग्न समारंभासाठी मुलगी सुमित्रा व नात तनिष्का हीला मोटारसायकल ( एमएच ०९ एफए ३९३७ ) वरुन घेऊन येत होते. ते कोरेगाव ( ता. वाळवा ) येथून वरणगे - पाडळीकडे निघाले होते. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप - कासारवाडी फाटा येथे त्यांच्या मोटारसायकलीस पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( एम एच ०९ सीयू ९६१७ ) जोराची धडक दिली. या धडकेत सुमित्रा या जागीच ठार झाल्या. त्यांची मुलगी तनिष्का व वडील रामचंद्र हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. सुमित्रा यांना दोन मुली आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे हे घटनास्थळावरून निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जखमींची विचारपूस केली. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
ट्रक चालक सरनबाब गणीहुसेन फकीर हा ट्रकमध्ये स्क्रॅप घेऊन कागल औद्योगिक वसाहतीमध्ये निघाला होता. वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने आपल्याच गावातील महिलेचा बळी घेण्यास तो कारणीभूत ठरला. कारण ट्रक चालक आणि मृत महिलेचे गाव कोरेगाव हेच आहे.
फकीर हा एसटी महामंडळात एसटी चालक म्हणून काम करत होता. हे करत असताना त्याने स्वतःचा वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्याचे मालकीचे चार ट्रक होते. वाहतूक व्यवसायासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने ट्रकही विकले. सद्या ते दुसर्याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.