yesterday fire update of CPR the ignores from fire fire audit in kolhapur 
कोल्हापूर

Kolhapur CPR Fire : फायर ऑडिटकडे कानाडोळा केल्यानेच बसला फटका

डॅनियल काळे

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याने  मोठी हानी झाली. सीपीआरला २०१३ पासून महापालिकेच्या अग्निशमन दलाने वारंवार सूचना देउन, नोटिसा देउन सीपीआर प्रशासनाने फायर ऑडिटमध्ये दाखविलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच हा फटका बसला आहे. फायर ऑडिटमध्ये सीपीआर परिसरातील २२ इमारतींत नेमक्‍या काय उपाययोजन करायला हव्यात? हे निदर्शनास आणून दिले; पण त्याकडे कानाडोळा केल्यानेच आपत्तीचा फटका बसला आहे. 

सीपीआर रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. संकटाच्या काळातील एक मोठे संकट होते. एका बाजूला कोरोनाशी लढा सुरू असतानाच आज नवी आपत्ती सीपीआरमध्ये उद्‌भवली. रुग्णांना शिफ्ट करणे आणि त्यांचे प्राण वाचविताना प्रशासनाची पहाटे धांदल उडाली; पण अशा घटनातून काही तरी बोध घेणे आवश्‍यक आहे. यापूर्वीही सीपीआरमध्ये अनेक घटना घडल्या; पण आपत्तीतून बचावासाठी नेमक्‍या उपाययोजना करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाल्यानेच असे प्रसंग घडत आहे. सीपीआर जिल्हा रुग्णालय आहे.

पाचशे खाटांचे रुग्णालय कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शेजारच्या कोकणवासीयांनाही आरोग्यसेवा देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. सीपीआरच्या परिसरात एकूण २२ इमारती आहेत. सीपीआरचे एकूण २९ विभाग येथे कार्यरत आहेत. रुग्ण त्यांचे नातेवाईक, डॉक्‍टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी हजारो नागरिकांचा येथे दररोज वावर आहे. कोरोना काळात तर उपचाराचे सीपीआर हेच एक महत्त्वाचे केंद्र आहे. महापालिकेने २०१३ सालापासून सात वर्षांत तीन वेळा फायर ऑडिट करून सीपीआर प्रशासनाला त्रुटींची यादी दिली आहे. 


खासगी रुग्णालयांत ९५ टक्के उपाययोजना

शहरात खासगी रुग्णालयांनी मात्र फायर ऑडिटच्या सूचनेप्रमाणे हॉस्पिटलमध्ये सुविधा निर्माण केल्या आहेत. बॉम्बे नर्सिंग होमच्या ॲक्‍टनुसार या सुविधा केल्यास त्यांची नोंदणी केली जात नसल्याने सक्तीने का होईना?, शहरातील ९५ टक्‍के खासगी रुग्णालयांनी या उपाययोजना केल्या आहेत.

फायर ऑडिटमध्ये दिलेल्या त्रुटी अशा 

- फायर एक्‍सटिंग्युजर बसविणे
- इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर होज गुंडाळी (पाईप गुंडाळी)         बसविणे
- इमारतीला डाउन कमर सिस्टीम बसविणे (पाईपलाईन)
- छतावर विद्युत पंप बसविणे
- स्वंयचलित तपासणी यंत्र बसविणे
- आपत्कालीन मार्गची  आवश्‍यकता
- बंदिस्त इलेक्‍ट्रॉनिक वायरिंग
- इमारती खाली ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी              बनविणे
 

"शहरात ४५० खासगी हॉस्पिटलस आहेत. या हॉस्पिटलांचेही फायर ऑडिट केले आहे. ऑडिटमध्ये दाखविलेल्या त्रुटी दूर केल्याशिवाय या हॉस्पिटलांच्या नोंदणीला अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. शहरातील बहुतांशी सुमारे ९५ टक्केहून अधिक रुग्णालयांनी फायर ऑडिटमध्ये दाखविलेल्या त्रुटी दूर केल्या आहेत. सीपीआर हा गोरगरीबांचा दवाखाना असल्याने येथे कारवाई करण्यातही अडचणी आहेत. आत्तापर्यंत तीनवेळा त्यांचे फायर ऑडिट झाले असून त्यांना त्रुटी दाखवून दिल्या आहेत."

- रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी

इमारती                         ११ 

एकूण विभाग                  २९
बेड                               ६५०   
कोविड बेड                    ४४०
डॉक्‍टर, कर्मचारी संख्या    २००० 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT