Kolhapur Crime Rajarampuri Police Station esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात चाललंय काय? राजारामपुरीत भरदिवसा पाठलाग करून तरुणाचा दगडाने ठेचून खून; मुरूम टाकून पुसले रक्ताचे डाग

पंकज सध्या राजारामपुरी तेराव्या गल्लीतील एका व्यावसायिकाकडे चालक होता.

सकाळ डिजिटल टीम

पंकज भोसलेचा खून झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच नातेवाईक, मित्रमंडळींनी सीपीआरच्या शवविच्छेदनगृहाजवळ गर्दी केली होती.

कोल्हापूर : राजारामपुरी पोलिस ठाण्यापासून (Rajarampuri Police Station) हाकेच्या अंतरावर काल भरदिवसा दुचाकीवरून पाठलाग करून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. राजारामपुरी तेराव्या गल्लीतील एका शाळेजवळ पूर्ववैमनस्यातून हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास घडला. हल्ल्यात पंकज निवास भोसले (वय ३३, रा. फर्नांडिस किराणा स्टोअर्स समोर, कनाननगर) याचा मृत्यू झाला.

खुनावेळी वापरलेल्या दुचाकीसह संशयित नीलेश ऊर्फ किशोर विक्रम काटे (२७) आणि त्याचा भाऊ गणेश (३०, दोघे रा. कनाननगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेश काटे आणि अमित गायकवाड पळून गेल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पंकज भोसले चालक म्हणून काम करत होता. यापूर्वी संशयित काटे भावांचा त्याच्याशी वाद झाला होता. त्या रागातून खून झाल्याचा संशय आहे.

पंकज सध्या राजारामपुरी तेराव्या गल्लीतील एका व्यावसायिकाकडे चालक होता. तो नोकरीवरून दुपारी तीनच्या सुमारास घरी जाताना काटेसह चौघेजण पंकजचा शोध घेते तेथे आले. त्यावेळी पंकज रस्त्यावर उभा होता. तेथे किशोर आणि गणेश यांनी त्याला पाहिले. दोघे मारहाण करतील, याचा अंदाज घेऊन पंकज बाजूला निघाला. त्यावेळी दोघांनी त्याचा पाठलाग केला. त्याला काठीने माराहाण केली. साधारण शंभर मीटरपर्यंत काठीने मारहाण करीत पाठलाग केला.

गल्ली क्रमांक पंधरामधील कोरगावकर हौसिंग सोसायटीच्या कोपऱ्याला त्याला खाली पाडून मारहाण केली. तेथीलच टोकदार दगड घेऊन त्याला ठेचले. यामुळे चेहऱ्यासह त्याच्या डोळ्‍याला गंभीर इजा झाला. तो तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याचवेळी तेथे पोलिस पोहोचले आणि चौघांपैकी दोघे पळून गेले तर दोघे दुचाकीवर बसत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

जखमी पंकजला पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पथकाने वेळीच धाव घेतल्यामुळे दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेता आले. अपर अधीक्षक जयश्री देसाई, शहर उप अधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्‍हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी संशयित आणि मृत या दोघांवरही यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांची झटपट कारवाई

खून झालेल्या ठिकाणी रस्त्यावर खोदाई काम सुरू आहे. तेथे पाठलाग करून मारहाण सुरू होती. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. निरीक्षक तनपुरे व पोलिस अरविंद पाटील तेथे पोहोचले. त्यांनी पळून जात असलेल्या किशोर आणि गणेशला ताब्यात घेतले.

दगड, दुचाकी जप्त

खुनासाठी वापरण्यात आलेला दगड, बूट, चप्पल आणि दुचाकी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मुरूम टाकून रक्ताचे डाग हटविले. फॉरेन्सिक लॅबची व्हॅन तातडीने घटनास्थळी आली. पथकाने तेथे रक्ताचे नमुने, ठसे आणि अन्य पुरावे चाचपले.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

चौघांनी मिळून पाळत ठेवून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. परिसरात सीसीटीव्ही आहेत. तेथील फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पळून गेलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेले दोघेही नशेत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सीपीआरमध्ये गर्दी

पंकज भोसलेचा खून झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच नातेवाईक, मित्रमंडळींनी सीपीआरच्या शवविच्छेदनगृहाजवळ गर्दी केली होती. त्याची बहीण आणि आई सध्या कनाननगरात राहतात. सशंयित आणि मृत दोघेसुद्धा कनाननगरात असल्यामुळे पोलिसांनी तेथेही बंदोबस्त ठेवला होता.

संपला की नाही?

दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांना काहींनी असे का केले, असे विचारल्यानंतर सोडणार नव्हतो त्याला. संपला की नाही, अशीही विचारणा दोघा हल्लेखोरांनी केली. संपला म्हटल्यावर जिंकले, असेही दोघांपैकी एकजण म्हणाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT