zero zero seven gangs from Rajasthan will be prosecuted under Moka by kolhapur poilice 
कोल्हापूर

कोल्हापूर पोलिस राॅक्स '007 गॅंग' शाॅक...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - किणी टोलनाक्‍यावर थेट पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या राजस्थानमधील ००७ गॅंगच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. गुन्ह्यातील तिघा संशयित गुंडांवर कारवाईच्या प्रक्रियेस सुरवात करण्यात आली असल्याचे 
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज सांगितले. दरम्यान, बेळगावसह हुबळी परिसरात दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून गुंडांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. 

थेट पोलिसांवर केला गोळीबार

किणी टोलनाक्‍यावर मंगळवारी (ता.२८) रात्री राजस्थानातील ००७ गॅंगमधील गुंडाची व कोल्हापूर पोलिसांची चकमक उडाली. यात गुंडानी थेट पोलिसांवर गोळीबार केला. जिगरबाज पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत तिघा गुंडाना जेरबंद केले. चकमकीत गॅंगच्या म्होरक्‍या संशयित श्‍यामलाल गोवर्धनराम पुनिया ऊर्फ बिष्णोई (वय २४), श्रावणकुमार मनोहरलाल मांजू (२४) जखमी झाले. त्या दोघांना सीपीआरमध्ये दाखल केले. साथीदार श्रीराम पाचाराम बिष्णोई (२२ रा. जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले. पेठवडगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. टोळीवर यापूर्वी राजस्थानमध्ये तब्बल ४८ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांवरच गोळीबार केल्याचा गंभीर गुन्ह्यातील श्‍यामलाल, श्रावणकुमार आणि श्रीराम या तिघांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. त्यानुसार तिघांवर मोका लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
जखमी श्‍यामलाल व श्रावणकुमारला सीपीआर अतिदक्षता विभागातून हलविण्यात आले आहे. उद्या (ता.१) श्रावणकुमारचा ताबा पेठवडगाव पोलिस घेण्याची शक्‍यता आहे. श्‍यामलालचा ताबा मिळण्यास आणखी दोन दिवसाचा अवधी लागणार आहे. 

गुंडांचा होणार दिर्घकाळ मुक्काम

राजस्थानमध्ये गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या ००७ गॅंगच्या गुंडावर अटकेची कारवाई झाल्यानंतर स्थानिक रसद मिळत होती. त्यामुळे त्यांना कारवाईचे भय नव्हते. त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत होती. आपले कोणी काही करू शकत नाही, या अविर्भावात ही गॅंग होती. मात्र गॅंगमधील तिघांवर कोल्हापुरात मोका अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याने संबधितांचे दाबे दणाणले आहेत. प्रथम त्या तिघांना पोलिसांवर हल्ल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. यातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या तिघांना मोकाखाली अटक होईल. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत कारागृहात जातील. त्यावेळी त्याचा ताबा राजस्थान पोलिस मागू शकतील, असे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावरून संबधित गुंडांचा कोल्हापुरात दिर्घकाळ मुक्काम असणार आहे.  

मोटार राजस्थानमधील...

किणी टोल नाक्‍यावरील चकमकीच्या वेळी गुंडानी वापरलेली पांढऱ्या मोटारीचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. त्याआधारे त्याच्या मालकाचा शोध पोलिसांनी घेतला. त्यात ही मोटार राजस्थानमधील एकाच्या नावे असून ती फायनान्स कंपनीकडून घेतली असल्याचे पुढे आले. संबधित मोटार मालकाचीही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

बेळगाव, हुबळी परिसरात छापे...

हुबळी येथे ता. २१ ते २८ जानेवारी दरम्यान वास्तव्यास असणाऱ्या श्‍यामलाल व साथीदारांच्या संपर्कात कोण कोण होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. ते हाती लागल्यानंतरच गुंडाकडून जप्त केलेल्या पिस्तुलासह त्यांचे हुबळीत येण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी बेळगाव, हुबळी परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून संबंधिताचा शोध घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT