Laxman Hake vs Manoj Jarange Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : 'जरांगे नावाच्या भुताला मुख्यमंत्र्यांनी बाटलीत बंद करावं आणि समुद्रात फेकून द्यावं'; हाकेंची सडकून टीका

बलराज पवार

''मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना शिव्या घालणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. या जरांगे नावाच्या भुताला सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे.''

सांगली : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आकलन शून्य आहे. समाजात आणि राज्यात अराजक निर्माण करणे हा एकमेव उद्देश त्यांचा आहे. ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, त्यालाही जबाबदार जरांगे पाटील असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) यांनी आज केला. हाके यांनी आज सांगलीत पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

हाके म्हणाले, मराठा आरक्षण, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या हक्क, अधिकाराबद्दल जरांगे पाटील यांचे आकलन शून्य आहे. ते अतिशय सुमार दर्जाचे आहेत. राज्यात अराजक निर्माण करण्याचा यांचा उद्देश आहे. यांच्यामागे नेमकं कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांना ना आरक्षणाबद्दल काही माहिती आहे, ना गरीब मराठा तरुणांबद्दल कळवळा आहे.

जी गोष्ट कधीच मिळणार नाही, कायद्याला घटनेला अपेक्षित नाही ती गोष्ट मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या जरांगे पाटील यांची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना शिव्या घालणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. या जरांगे नावाच्या भुताला सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठा नेत्यांनी निवडणुका जिंकण्याचे व्याकरण आत्मसात केले आहे. त्यामुळे मराठा आमदार, खासदारांनी आम्ही निवडून येतो आहे म्हणजे आमची संख्या जास्त आहे हे डोक्यातून काढून टाकावे. ओबीसी दुय्यम स्थानी आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही असे काही समजू नये. याला आम्ही उत्तर जरूर देऊ. सरकार जर जरांगेना घाबरत असेल तर ओबीसींची काय ताकद आहे हे आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भूताला बाटलीत बंद करावे आणि समुद्रात फेकून द्यावे, असेही हाके म्हणाले. प्रकाश शेंडगे म्हणाले, जरांगे पाटील पुन्हा आंदोलन सुरू करणार म्हणतात; पण आंदोलनाचे हत्यार आम्हीही उपसू. सगेसोयऱ्याचा जीआर काढणे सरकारला अवघड आहे. सरकारला जर शहाणपण सुचले नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे हत्यार आमच्याकडे आहे. आम्हीपण उमेदवार पाडू शकतो. घटना दुरुस्त करा आणि आरक्षण घ्या. पण, ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही. प्रसंगी राजकीय आणि रस्त्यावरची लढाई हातात घेऊ, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT