संख ः करजगी (ता जत, जि. सांगली) येथील बोर ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला सांगली पाटबंधारे विभागाकडून लोखंडी बरगे घालायचे काम केली जाते. ठेकेदाराला काम देण्यात आले होते. ठेकेदारांना बरगे व्यवस्थित व आवश्यक साधन सामुग्री न वापरल्याने पाणी दरवाजातून वाहून गेले आहे. रब्बी हंगामातील पिके, द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत येणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बंधाऱ्याची आवस्था 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे.
पूर्व भागातील करजगी येथे गावालगत बोर नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा कृष्णा खोरे महामंडळअंर्तगत 2003 मध्ये बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहेत. पाणीसाठा 16 द. घ.ल. फु. आहे. एकूण ओलिताखाली येणारे क्षेत्र 500 एकर आहे. हा बंधारा रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब फळबाग, ऊस पिकासाठी उपयुक्त आहे. बंधाराची दुरुस्ती देखभाल पाटबंधारे विभागाची आहे.
पाणी आडविण्यासाठी लोखंडी बरगे (प्लेट) दरवाजे बसविलेले आहेत. त्यामध्ये लोखंडी बरगे व्यवस्थित न बसविल्याने त्यामध्ये गॅंप पडलेला असल्याने पाणीची गळती सुरु झाली आहे.या अगोदर भागात दमदार पाऊस न झाल्याने दरवाजातून पाणी गळतीचा प्रश्नच आला नाही. लोखंडी दरवाजे व्यवस्थित न बसवल्याने या बंधाऱ्यातील पाणी गळती सुरु आहे.सध्या बंधाऱ्यात 10 टक्केच शिल्लक आहे.
बागांना टॅंकरने पाणी
गेल्यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी टॅकरने पाणी घालून द्राक्षे बागा जगविल्या आहेत. पाण्याची गरज वाढली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाजे बसविण्याची मागणी केली. परंतु त्याचे सेंटीग व्यवस्थित न झाल्याने दरवाजातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
फळबागांना नवसंजीवनी
गावात द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे.फळबागेचे चांगले उत्पादन घेतले जाते.या बंधाऱ्याचा फायदा फळबागांना होणार आहे.त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी साठा फळबागांना नवसंजीवनी ठरणार आहे. बंधारा कोरडा पडल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन बंधारा दुरुस्तीचे काम परत करावे. कामाची चौकशी करावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.