सातारा : वस्तूंच्या दरात जास्त फायदा नसला की वजनाच्या मापात पाप करण्याची भानगड अनेक जण करत असतात. अशा जिल्ह्यातील 245 विक्रेत्यांवर कारवाई करून वैधमानशास्त्र विभागाने तब्बल दीड कोटी रुपयांची कारवाई केली आहे.
हे वाचा : सातारा जिल्हा बँकेतही महाविकास
पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जादा किमतीने विक्री करणे, मूळ छापील किमतीत खाडाखोड करणे, पॅकबंद वस्तूंवर नियमानुसार आवश्यक घोषवाक्य नसणे, वस्तू खरेदी करतेवेळी वजन व मापात फसवणूक करून वजनान, मापाने वस्तू जादा घेणे, वस्तू विक्री करतेवेळी वजने न ठेवणे, अप्रमाणित वजने व मापे वापरणे, वजने मापे विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करून न घेणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने सोयाबीन खरेदीदार, वे ब्रीज उपयोगकर्ते, खते बी बियाणे व कीटकनाशके विक्रेते व उत्पादक, हार्डवेअर विक्रेते, इलेक्ट्रिक विक्रेते, दूध व दुग्धजन पदार्थ विक्रेते व उत्पादक, मद्य व बिअर विक्रेते यांचा समावेश आहे.
आणखी वाचा : सेना मंत्री अन् एसपींचं जमलं
वैधमानशास्त्र विभागाने एक एप्रिल ते 31 डिसेंबर 2019 अखेर जिल्ह्यातील 305 आस्थापनांची तपासणी केली. तपासणीत 245 किरकोळ विक्रेते, ठोक विक्रेते, उत्पादक कंपन्यांवरती वजने मापे कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आले. त्यातील दंडातून एक कोटी 50 लाख 48 हजार 553 इतका महसूल जमा झाला. यात सात खटले बिअर व मद्य विक्रेते, ठोक विक्रेते व उत्पादकांवर दाखल केले आहेत. ही कारवाई सहायक नियंत्रक रा. ना. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक एस. बी. सावंत, डी. जी. कांबळे, एल. यू. कुटे, एस. जी. धोपाटे, आर. पी. आखरे यांनी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.