बेळगाव : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) जाहीर प्रचाराचाला धुरळा खाली बसतो न बसतो तेच सरकारच्या हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला (Winter Legislative Assembly) उद्यापासून (ता.१३) बेळगावात (Belguam) सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बेळगावात आयोजित पहिले अधिवेशन असून, अधिवेशनात विविध विषयांवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत.
कोविड (Covid 19) आणि त्यात नव्या रुपातील ओमिक्रॉन (Omicron) विषणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगावात हिवाळी अधिवेशन नको, असा सूर होता. परंतु, हा विरोध डावलून मुख्यंमत्री बोम्मई अधिवेशन बेळगावात घेण्यावर ठाम राहिले. त्याप्रमाणे सोमवारपासून (ता.१३) त्याची सुरवात होणार असून, २४ डिसेंबरला सूप वाजेल. अलिकडे घोषित विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक व कोविडस्थिती आदी विषय हे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, पीक भरपाईसह अलिकडे केंद्राने मागे घेतलेले तीन कृषी संबंधीत कायदे विषयावरही चर्चा होऊ
राज्यात यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे आतोनात हानी झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. परंतु, अद्याप भरपाई दिली नाही. चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा, लिंगायत, मराठा समाज आरक्षणाचे विषय अधिवेशन दरम्यान गाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून, यंदाच्या अधिवेशनाचे वैशिष्ठ्य म्हणजे अधिवेशन वेबकास्ट होणार आहे.
दरम्यान, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोविडचे नियम काटेकोर पाळले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विनाकोविड चाचणी सभागृहामध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अधिवेशननिमित्त बेळगाव शहर, उपनगर आणि सुवर्णसौधच्या परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. यामुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
१० दिवसांसाठी कोट्यावधीचा चुराडा
बेळगावातील विधीमंडळ अधिवेशनासाठी दरवर्षी २० ते २४ कोटी रुपयांचा चुराडा व्हायचा. पण, यंदा त्याला लगाम लावण्यात येत आहे. खर्च ५० टक्के कमी करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सुटीचे चार दिवस वगळल्यास बेळगावातील विधीमंडळ अधिवेशन १० दिवस चालणार आहे. १३ ते २४ डिसेंबर या दरम्यान अधिवेशन चालणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.