lenders numbers increased in sangli palus demand stop harassment in palus 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : पलूस तालुक्‍याला सावकारीचा विळखा; टोळीला लगाम घालण्याची मागणी

संजय गणेशकर

पलूस (सांगली) : पलूस तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा सावकारीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, छोटे-मोठे व्यावसायिक सावकारीच्या पाशात अडकले आहेत. बेकायदा सावकारीच्या माध्यमातून लूट करणाऱ्या सावकारांच्या टोळीला लगाम घालण्याची मागणी होत आहे. 

पलूस तालुका हा सधन तालुका मानला जातो. कृष्णा नदीच्या पाण्याने येथील शेती सुजलाम-सुफलाम झाली आहे. शेतीतील उत्पन्न चांगले आहे.शेतीला जोडधंदे आहेत. विविध उद्योग- व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, तरीही गोरगरीब, शेतकरी, शेतकरी, व्यावसायिक आर्थिक मंदी, लहरी निसर्ग, मुलांचे शिक्षण,विवाह, दवाखाना व इतर कौटुंबिक कारणाने अडचणीत येत असतात. बॅंका, सोसायटीच्या, पतसंस्था यांच्या वाटा बंद झाल्यानंतर अडचणीच्या वेळी नाईलाजाने सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय रहात नाही. याचा बरोबर गैरफायदा सावकार घेत आहेत.

अगदी पाच टक्केपासून ते पंधरा ते वीस टक्केपर्यंत शेकडा मासिक व्याज आकारणी सावकार करीत असतात. मुद्दलीपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्याज सावकारांना द्यावे लागत आहे. भरमसाट व्याजाची रक्कम होत असल्याने कर्जदार व्याज व मुद्दल भरू शकत नाही. काही सावकार तर स्वतः गुंड आहेत. तर काही सावकार गुंडांकरवी शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी देऊन वसुली करीत असतात. तर काही सावकार जबरदस्तीने कर्जदारांची जमीन, घर नावावर करून घेत आहेत. सावकारांचे विविध प्रकार आहेत.

काही सावकार मुळातच सावकार आहेत. ते स्वतः व्याजाने पैसे फिरवतात. तर काही जण इतरांना पुढे करून कमिशनवर सावकारीचा व्यवसाय करीत आहेत. या सावकारांना कर्जदार अक्षरशः वैतागले आहेत. सावकारांची दहशत इतकी आहे की, पोलिसांत सावकारांविरुद्ध कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. पोलिसही लेखी तक्रार असल्याशिवाय कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सावकारांनी धुमाकूळ घातला आहे. यांना आवरणार कोण ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. 

नावालाच परवाना 

तालुक्‍यातील काही सावकारांकडे सावकारीचा परवाना आहे. ज्वेलरी व्यावसायिकांकडेही सावकारीचा परवाना आहे. बॅंकांचे व्याजानुसारच सावकारांनी व्याज आकारणी करावी. असा नियम आहे. मात्र, हे सावकार कमीतकमी मासिक दोन ते तीन टक्के व्याज आकारणी करीत आहेत. सोने गहाण घेऊन ज्वेलरी व्यावसायिक व फायनान्स कंपन्या सावकारीच्या परवाण्याखाली लूट करीत आहेत. यावर कोणत्याच प्रशासकीय यंत्रनेचा वचक नाही. उलट अशा सावकारांना संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. शासनाने या सावकारीचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे. 

"बेकायदा सावकारांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, कर्जदारांनी सावकारांकडून अन्याय होत असेल, तर पुढे येऊन तक्रार देणे गरजेचे आहे. तक्रार आल्यास निश्‍चितच कारवाई करण्यात येईल."

- निवास ढाणे, तहसीलदार, पलूस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT