पश्चिम महाराष्ट्र

सांगली परीसरात बिबट्याची एंट्री; वनविभागाचे सतर्कतेचे अवाहन

सकाळ वृत्तसेवा

तुंग (सांगली): काही महिन्यांपूर्वी सांगली शहरात बिबट्या(Lepord) आल्याचा प्रसंग अजून लोक विसरले नाही तोच आता सांगलीपासून (sangli)जवळच असलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे पहाटे बिबट्या आढल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कसबे डिग्रज(kasbe digraj)गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे त्याच्या पायाच्या ठश्यावरुन आढळून आले आहे. (leopard-entry-in-kasbe-digraj-area-forest-department-alert-appeal-sangli-marathi-news)

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान कसबे डिग्रज मधील नितीन माने हे शिराळ्याकडून गावी येत असताना त्याना सर्वप्रथम बिबट्या दिसला. त्यांनी हि घटना वनविभागाला कळवली.त्यानंतर रात्री दिडच्या सुमारास बिबट्याने गावातील बागणवाट जवळील हॉटेल शिलेदार येथील आत मध्ये असलेल्या कुत्र्याला भक्ष्य बनवण्याच्या उद्देशातून हल्ला केला. हॉटेल शिलेदार शेजारील सुकुमार दूधगावे यांच्या शेतात मोठ्या ठश्या सोबतच लहान ठसेही आढळल्याने या बिबट्या सोबत लहान बछडा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्या आल्याची बातमी समजताच वनविभाग आणि संबंधित लोकांनी येऊन तात्काळ पंचनामा केला आहे.

दरम्यान वन विभागाकडील माहितीनुसार हा बिबट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे. ठस्यांच्या अंदाजावरून तो साधारणपणे चार साडेचार वर्षांचा असल्याचे समजते. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बिबट्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच कसबेडिग्रज तुंग भागातून नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कसबे डिग्रजसह आजूबाजुच्या गावातील लोकांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून दवंडी देऊन ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या ज्या ठिकाणाहून गेला त्या ठिकाणाची पाहणी केली असता तो तुंग गावाच्या दिशेने गेला असल्याचे दिसून आले.उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, सागर थोरवत वनरक्षक सांगली तसेच वन कर्मचारी इकबाल पठाण, संभाजी ढवळे तसेच तसेच जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सचिन डांगे, रामचंद्र मासाळ, संजय शिंदे,सागर चव्हाण आदीं सहभागी होते.

अफवा वरती विश्वास न ठेवता बिबट्या दिसल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना सतर्क राहावे.

वनविभाग सांगली

कसबे डिग्रज आणि शेजारील परिसरातील शेतामध्ये बिबट्याचा वावर अढळून आला आहे. या परिसरातील शेतकरी वर्गाने शेतीच्या कामासाठी जाताना काळजी घ्यावी बिबट्या दिसताच वन खात्याशी संपर्क साधावा.

विशाल चौगुले,जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT