Loksabha Election Prateek Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांच्या सुपुत्राकडून लोकसभेची तयारी? 100 गावांत गणपती आरतीसाठी हजेरी, माने-शेट्टींसह प्रतीक यांच्यात निवडणुकीची चिन्हे!

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजणार आहे.

विजय लोहार

प्रतीक यांना हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते.

नेर्ले : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजणार आहे. वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी वाळवा, शिराळा तालुक्यातील १०० च्यावर मोठ्या गावात गणपती मंडळाच्या आरतीसाठी हजेरी लावली.

पूर्वी माजी मंत्री जयंत पाटील हेदेखील विविध गावात गणेश मंडळांच्या आरतीनिमित्त जात होते. त्यातून युवकांत वलय तयार केले. मतदारावर पकड ठेवली. हाच कित्ता प्रतीक यांनी गिरवल्याचे चित्र आहे. युवकांची ताकद पाठीशी उभे राहण्यासाठी प्रतीक पाटील प्रयत्नशील असल्याचे दिसते.

गणेशोत्सव राजकारणासाठी नाही, असे मार्गदर्शक सांगत असले तरी लोकसभेसाठी ही खांदेमळणी तर नाही ना, असा सूर ऐकू येत आहे. प्रतीक पाटील युवकांचे संघटन करण्यात सरस ठरत असल्याचे चित्र आहे. हातकणंगले मतदारसंघात गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा त्यांनी पराभव झाला.

आघाडीच्या काळात शेट्टींनी राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी करत नशीब आजमावले. मात्र मतदारांनी नाकारले. आता पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेतून उमेदवारी मिळालेले माने यांनी फारकत घेत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय आडाखे बदलतील, हे नक्की. आताची स्थिती पाहता शेट्टींनी हातकणंगले मतदारसंघात उसाच्या मुद्द्यावरून रान पेटवले आहे.

मी कुणाशीही युती अथवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यामुळे शेट्टी स्वाभिमानीतून ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहेत. शिवसेनेची शकले झाल्याने मते विभागली जाणार, हे नक्की. हातकणंगले मतदारसंघात खासदार माने व शेट्टी या मातब्बरांपैकी उत्तर पूर्व भागातील शिराळा, वाळवा, शाहूवाडीत राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यरत आहे.

माने-शेट्टी व प्रतीक यांच्यात निवडणुकीची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला मतदारसंघ मिळेल. प्रतीक यांना हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते. माजी मंत्री जयंत पाटील हे सकारात्मक आहेत. हातकणंगले मतदार संघाच्या इस्लामपूर व शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख व राज्य कार्यकारिणीत असलेले महाडिक यांचा प्रतीक यांना कडवा विरोध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack: 9 वर्षाची सर्वात लहान साक्षीदार... कसाबच्या विरोधात कोर्टात दिली होती साक्ष! कोण आहे ती मुलगी

Weather today : राज्यात गारठा वाढला, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार

Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Share Market Opening: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ

PAN 2.0 Project: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार

SCROLL FOR NEXT