राष्ट्रवादीची मोठी कुमक खासदार संजय पाटील यांच्यासमवेत आधीच भाजपकडे गेली आहे. मिरज पूर्व भागातील चित्र संमिश्र आहे.
Loksabha Election : महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समित्या अशा बहुतेक सर्व सत्तास्थानांवर एकमुखी किंवा काँग्रेससमवेत राहून वर्चस्व मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जिल्ह्यात सुन्न शांतता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खुद्द जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत ते पक्षात राहणार का, असे प्रश्नचिन्ह आहे. शिराळ्याचे मानसिंगराव नाईक आणि तासगावच्या सुमन पाटील (Suman Patil) या दोन्ही आमदारद्वयींकडूनही पक्ष म्हणून जिल्हास्तरावर फारशा अशा हालचाली नाहीत. एकूण, आजही जयंतरावांचा ‘कार्यक्रम’ जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह भाजप-काँग्रेसचेही भविष्य ठरवण्यात निर्णायक असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरच्या घडामोडीत अजित पवारांचाच पक्षच ‘अधिकृत’ ठरल्यानंतरही त्यांच्या हाती जे काही चार- दोन कार्यकर्ते हाती लागले आहेत, ते प्रामुख्याने जिथे राष्ट्रवादीचे आमदार नाहीत, इथलेच आहेत. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणून सामसूम असली, तरी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीदरम्यान जी काही सांगली (Sangli) लोकसभेला लढत होईल, त्यासाठीच्या महत्त्वाच्या सोंगट्या जो कोणी हलवू शकेल, असा नेता म्हणून जयंत पाटील यांचे स्थान आजही अबाधित आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांची लोकसभेच्या इतिहासात प्रथमच प्रत्यक्षातील आणि अप्रत्यक्षातील भूमिका एकच असेल, अशी ही यंदाची निवडणूक असण्याचीही शक्यता आहे.
कारण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एखादी घडामोड असेल, तर त्यात जयंत पाटील यांची भूमिका काय, अशी शोधाशोध आजवर नेहमीच होते. यावेळीही ती होताना दिसत आहे. जसे की; सध्या महाआघाडीतील जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला देण्यात जयंत पाटील यांचाच हात असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांचे आजवरचे राजकारण भाजपला समवेत घेतच बहरले आहे. एकूणच, भाजप त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पक्षालाच चोहोबाजूने घेरत असताना, ते त्यांचा आजवरचा भाजपसमवेतचा दोस्ताना कायम ठेवणार की खरोखरीच काँग्रेससमवेत नव्या दमाने राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकणार, याचा फैसला याच निवडणुकीत होणार आहे.
कारण त्यानंतर विधानसभेच्या मैदानात त्यांना पुन्हा भाजपसह विरोधकांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी ते दोन हात करणार की नवा रस्ता शोधणार, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असेल. एक निश्चित की, लोकसभेचे मैदान सुरू होताच जयंत पाटील जी काही भूमिका घेतील, ती या निवडणुकीचीच नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीचीही दिशा ठरवेल. शिराळा आणि वाळवा तालुके हातकणंगले मतदारसंघाचा भाग आहेत. त्या दोन्ही ठिकाणी जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका निर्णायक असेल. सांगली मतदारसंघात तासगावमधील ‘आरआर’ गटाची भूमिका प्रारंभापासून वसंतदादा घराण्यासमवेत प्रामाणिक राहण्याची आहे. तीच यावेळी असेल तर असे दिसते.
अडचण तेव्हाच आहे की, महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यात विशाल पाटील अपयशी ठरतील. ‘पलूस-कडेगाव’मधील राष्ट्रवादीची धुरा आमदार अरुण लाड यांच्यावर असेल. ते महाविकास आघाडीसमवेत पूर्ण ताकदीने असतील. खानापूर, विट्यात ॲड. बाबासाहेब मुळीक, जतमध्ये सुनील पवार वगळता सुरेश शिंदे, चन्नाप्पा होर्तीकर, सुभाष बसवराज पाटील अशी मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमवेतच आहेत. तेच कवठेमहांकाळमध्ये नुकतेच अजित पवार गटात गेलेल्या जयसिंग शेंडगे वगळता अन्य सर्व कार्यकर्ते नेत्यांबाबत आहे. अर्थात, इथली राष्ट्रवादीची मोठी कुमक खासदार संजय पाटील यांच्यासमवेत आधीच भाजपकडे गेली आहे. मिरज पूर्व भागातील चित्र संमिश्र आहे.
मिरज शहरात अभिजित हारगे एकमेव ताकदीने जयंत पाटील यांच्यासमवेत आहेत. बाकीच्या मंडळीचे तळ्यात-मळ्यात आहे. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची १८ नगरसेवकांची ताकद आता दुभंगली आहे. इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, सुरेश पाटील असे माजी महापौर किंवा पद्माकर जगदाळे, विष्णू माने यांच्यासारखे माजी नगरसेवक मंडळींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा घेतला आहे. या सर्वांच्याच भूमिकेबाबत आत्ताच स्पष्ट भूमिका जाहीर करणे घाईचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.