low temperature at Kopargaon 
पश्चिम महाराष्ट्र

कोपरगाव गारठले; तापमान नीचांकी अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : तापमान गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरल्याने शहर परिसर गारठला आहे. कोपरगावचा पारा 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यातच ग्रामीण भागात काही ठिकाणी धुक्‍याची चादर पसरली आहे. गहू, हरभरा आदी पिकांना थंडी पोषक असली, तरी ऊसतोडणी कामगारांचे थंडीमुळे हाल होत आहेत.

हेही वाचा- भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी "उदंड झाले इच्छूक' 

गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगले होते. त्यातच गोदावरीचे पात्र अजूनही भरलेले आहे. त्यामुळे शहर परिसरात थंडीची तीव्रता वाढली आहे. निफाड (जि. नाशिक) भागातही पारा सातपर्यंत खाली गेला आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्य परिसरात परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत.

व्यावसायिकांना सुगीचे दिवस 

ग्रामीण भागातून शहरात रोजीरोटीसाठी येणाऱ्या कामगारांना या कडाक्‍याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. उबदार स्वेटर, मफलर, टोपी आदी व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

दवाखाने हाऊसफुल्ल

थंडीमुळे सर्दी, खोकला, थंडी-तापाच्या रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. शेतकऱ्यांना पिकांवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. 

कोपरगावातील नीचांकी तापमान 
 

वर्ष नीचांकी तापमान 
(अंश सेल्सिअस) 
1 डिसेंबर 2002 8
18 जानेवारी 2003 3.5
8 फेब्रुवारी 2004
18 जानेवारी 2005  5.5
24 जानेवारी 2006 4.5
30 नोव्हेंबर 2007 3.5
27 जानेवारी 2008 4.5
12 फेब्रुवारी 2009 9
21 डिसेंबर 2010 7
7 जानेवारी 2011 5
9 फेब्रुवारी 2012
 15 डिसेंबर 2013 6.5 
10 फेब्रुवारी 2014  7.5
10 जानेवारी 2015  5.5
27 डिसेंबर 2016 6.5
6 जानेवारी 2018 7

  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT