Sharad Pawar Mahankali Sugar Factory Shetkari Melava esakal
पश्चिम महाराष्ट्र

'राज्यात तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल'; शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचा मोठा दावा

सकाळ डिजिटल टीम

''नीलेश लंकेंसारखे अनेक सामान्य कार्यकर्ते लोकसभेत गेले. भाजप नेते नेहरू, इंदिराजींवर टीका करीत आहेत. मात्र, राहुल शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.''

कवठेमहांकाळ : राज्यात तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येईल, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. येथील महांकाली साखर कारखान्याच्या (Mahankali Sugar Factory) परिसरात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. युवक नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या वाढदिवसानिमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पवार म्हणाले, ‘जीवाभावाचा, स्वच्छ भूमिकेचा प्रामाणिक सहकारी म्हणून मी आर. आर. पाटील यांना साथ दिली. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमदार सुमनताई आणि रोहित काम करीत आहेत.

येत्या काळात महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. अशावेळी तुम्ही रोहितच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. लोकसभेला आमच्या आघाडीला ३१ जागा मिळाल्या. नीलेश लंकेंसारखे अनेक सामान्य कार्यकर्ते लोकसभेत गेले. भाजप नेते नेहरू, इंदिराजींवर टीका करीत आहेत. मात्र, राहुल शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.’

रोहित पाटील म्हणाले, ‘आबांनी या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया करण्याचा शब्द दिला आहे. अंबाबाईच्या या पांढरीचे ऋण मी फेडून त्यांचा शब्द पूर्ण करेन. महांकाली कारखाना सुरू झाल्यास तालुक्याच्या बाजारपेठा पुन्हा फुलतील. शेतकऱ्यांनी माझ्याकडे तशी मागणी केली आहे. इथे एमआयडीसी होऊ नये, यासाठी श्रेयासाठी अनेकांनी विरोध केला; पण आम्ही ती मंजूर करून दाखवली. आज इथे आणखी एक खूशखबर देतो की एमआयडीसीसाठी आवश्‍यक पाण्याचा आरक्षित कोटाही मंजूर झाला आहे.’

आमदार अरुण लाड यांनीही रोहित पाटील यांच्या पाठीशी ठाम राहा, असे आवाहन केले. प्रास्ताविकात अनिता सगरे यांनी महांकाली कारखाना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद असून, तो पुन्हा सुरू करावा, अशी मागणी केली. यावेळी सुरेश पाटील, विराज नाईक, बाबासाहेब मुळीक, बी. एस. पाटील, शंकरदादा पाटील, चिमण डांगे, ताजुद्दीन तांबोळी, विकास हाक्के, विश्र्वास पाटील, सुश्मिता जाधव, बाळासाहेब पाटील, शंतनू सगरे, गणेश पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, माजी सभापती सुरेखा कोळेकर, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, साधना कांबळे, रामभाऊ थोरात यांचीही भाषणे झाली.

हणमंतराव देसाई, माजी सभापती प्रशांत शेजाळ, दादासाहेब कोळेकर, महेश पवार, चंद्रशेखर सगरे, माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, तालुकाध्यक्ष संजय पाटील, महेश पाटील, रवी माने, संतोष पवार, अश्विनी पाटील, अनिता खाडे, मीनाक्षी माने, गणेश पाटील, अमर सावळे, शंकर कदम आदी उपस्थित होते.

...तर ‘महांकाली’ला पहिली मदत

पवार म्हणाले, ‘या राज्य सरकारने अडचणीतील तेरा कारखान्यांना मदत केली, मात्र महांकाली कारखान्याला केली नाही. दिलेल्या मदतीबद्दल आपली तक्रार नाही. मात्र, दुष्काळी भागातील अनेक कारखान्यांकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. केवळ बलवानांना त्यांची मदतीची भूमिका आहे. मात्र आम्ही सत्तेत येताच; अशा सर्वच कारखान्यांना मदतीचा हात देऊ. त्यात पहिला निर्णय महांकालीचा असेल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT