बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा बेळगावाच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. मालवण, रत्नागिरी हापूस व पायरी आंबा असून पहिल्याच दिवशी आंब्याला चांगला भाव मिळाला. हापूसला प्रतिडजन २ हजार ते ४५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. सध्या सिजनला सुरुवात झाली असल्याने जुन १५ पर्यंत हा सिजन चालणार आहे. (Mango In belgaon Market)
दरवर्षी आंबा शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बाजारपेठेत पोहोचतो. पण यावर्षी १० दिवस लवकरच आंब्याची आवक सुरू झाली आहे. शनिवारी (ता. १९) सकाळी येथील फळ मार्केटमध्ये बोली लावण्यात आले. पहिल्यांदाच आंबा आल्याने खरेदीसाठीही व्यापाऱ्यांची झुंबड उडाली होती. बेळगावच्या बाजारात सुमारे ५० बॉक्स आंबा दाखल झाला होता. यानंतर रोजच आंबा येणार असल्याची माहिती मिळाली.
रत्नागिरी व मालवन हापुसला बेळगावसह परिसरातून मोठी मागणी असते. बेळगावात आंबा सिजनमध्ये दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदाही अशी उलाढाल अपेक्षीत आहे. शनिवारच्या बाजारात उत्तम दर्जाच्या हापुसाची प्रतिडजन ४५०० रुपयांना विक्री झाली. त्यानंतर मध्यम आंबा ३००० रुपये तसेच त्यानंतर २२०० ते २५०० रुपये दर मिळाला. याचबरोबर पायरी आंब्याला मागणी होती. पायरी आंबा प्रतिडजन ५०० रुपये १३०० रुपयांना गेला. बागलकोट, जमखंडी, बंगळूर, गोवा तसेच बेळगाव शहर व परिसरातील आंबा विक्रेत्यांनी हा आंबा खरेदी केला.
बाजारात आंबा सिजनला सुरुवात झाली आहे. मालवन व रत्नागिरी आंबा दाखल झाला. यंदा पहिल्याच दिवशी आंब्याला प्रतिडजन चांगला दर मळाला. बागलकोट, बंगळूर, गोवा आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी आंबा खरेदी केला. यानंतर बेळगावात रोज आंबा दाखल होईल.
-नितीन देसाई, आंबा व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.