Maratha Kranti Morcha esakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : सांगलीत धडकणार मराठा वादळ; मोर्चात 2 लाखांच्या सहभागाचा अंदाज, सामाजिक संघटनांचा पाठिंबा

जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते.

सकाळ डिजिटल टीम

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

सांगली : मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळालेच पाहिजे आणि जालना येथे आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. १७) सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ‘मराठा मोर्चा-२’ काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सुमारे दोन लाख मराठा बांधव यात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. विश्रामबाग येथून या मोर्चाची सुरुवात होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. तेथे व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही या मोर्चाला पाठिंबा मिळत आहे. मोर्चामध्ये दोन लाख मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

गायकवाड समितीने केलेल्या शिफारसीनुसार आरक्षण देण्यात यावे. सरकारने योग्य ती पाऊले उचलून दिल्लीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पोहोचवाव्यात, अशी मागणी केली जाणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली शहरासह जिल्ह्यातील गावागावांत तयारी पूर्ण झाल्याचे चित्र होते. मराठा बांधवांनी शिस्त पाळून शांततेत मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ मराठा समाजाने बंद आणि मोर्चे काढत सरकारचा निषेध केला. सांगलीतही गेल्या आठवड्यात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर ‘क्रांती मोर्चा-२’चे नियोजन करण्यात आले.

असा निघणार मोर्चा

विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि जिजामातांना वंदन करून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. साडेअकरा वाजता राम मंदिर चौकात मोर्चा पोहोचेल. तेथे मराठा क्रांतीची मशाल पेटवली जाईल. आरक्षण संदर्भातील पाच मुलांची भाषणे होतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्‍यांना देण्यात येणाऱ्‍या निवेदनाचे वाचन होईल.

सामाजिक संघटनांचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर लिंगायत समाज, मुस्लिम समाज, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, मराठा केमिस्ट संघटना आदी विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी वाटप करण्यात येणार आहे. लिंगायत समाजाकडून अल्पोपहाराचे वाटप केले जाईल. केमिस्ट असोसिएशनकडून मोर्चानंतर स्वच्छता केली जाणार आहे.

मोर्चा मार्गावरील व्यवस्था

विश्रामबाग चौकातून राम मंदिर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मार्गावर विश्रामबाग, गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक, सिव्हिल चौक येथे अ‍ॅम्ब्युलन्स तैनात केल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. मोर्चाच्या मार्गावर दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था

चारचाकी गाड्यांसाठी ः सांगलीवाडी चिंचबाग, जनावरे वैरण बाजार, मल्टीप्लेक्स थिएटरजवळ, तात्यासाहेब मळा, मार्केट यार्ड, आयटी पार्क, चिंतामणराव महाविद्यालय, वालचंद कॉलेज, राजमती मैदान दुचाकी वाहनांसाठी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, मार्केट यार्ड, कांतिलाल शाळा, राजमती शाळा याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT