Manoj Jarange-Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange-Patil : '...तर आमचे उमेदवार अपक्ष लढणार'; विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान

Manoj Jarange-Patil : आमच्या निर्णयाने कुणाला फायदा-तोटा होत असेल, तर त्याचा विचार आम्ही करत नाही.

सकाळ डिजिटल टीम

'विधानसभेच्या जागा लढवायच्या ठरवल्यास सामान्य मराठा अपक्ष म्हणूनच लढतील. आमच्याकडे मते आहेत. अपक्ष पुरस्कृतही करू शकतो.'

सांगली : ‘‘मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवायची का, हा निर्णय घेण्यासाठी २९ ऑगस्टला अंतरवली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक होणार आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाल्यास गरीब आणि गरजवंत मराठा हे अपक्ष म्हणूनच मैदानात उतरतील. मी कुठलाही पक्ष काढणार नाही. कारण मला राजकारणात यायचे नाही. आमच्या मागण्या मान्य करा, मी राजकारणात पडणार नाही,’’ असे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी स्पष्ट केले.

आरक्षण दिलं नाही तर सुपडासाफ होणारच आहे, असा इशाराही त्यांनी दिला. सांगलीत काल सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. शांतता रॅलीसाठी गुरुवारी ते सांगलीत आले होते. कोल्हापूरला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री. जरांगे म्हणाले, ‘‘सगळ्याच जातीच्या लोकांना कळाले आहे, नेते आपल्यासाठी नाहीत. त्यामुळे राज्यव्यापी बैठकीत सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतील.

विधानसभेच्या जागा लढवायच्या ठरवल्यास सामान्य मराठा अपक्ष म्हणूनच लढतील. आमच्याकडे मते आहेत. अपक्ष पुरस्कृतही करू शकतो. जे मराठा प्रश्नांच्या विचाराचे आहेत, त्या राखीव जागेवरील उमेदवारांनाही पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल. आमच्या निर्णयाने कुणाला फायदा-तोटा होत असेल, तर त्याचा विचार आम्ही करत नाही. सत्तापरिवर्तनाच्या लढाईत सामान्य मराठा समाज ताकदीने उतरेल. आम्हाला राजकारणाकडे जायचे नाही. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सगेसोयरेचा शासन निर्णय करा. आमचे म्हणणे त्यांना समजूनच घ्यायचे नाही का? जो मराठा आरक्षणाला विरोध करतो. त्यांनाही आमचा विरोध असेल, मग तो समाजाचा असला तरीही.’’

‘‘मराठ्यांच्या अन्नात औषध कालवण्याचे काम करू नका. सरकारच्या हाताला लागलेल्या समन्वयकांना माझे सांगणे आहे. मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधात जायची ही वेळ नाही.’’ देवेंद्र फडणवीस हे माझ्या बदनामीचे षड्‌यंत्र रचत आहेत, असे सांगत जरांगे पाटील म्हणाले, ‘‘प्रस्थापित नेत्यांनी प्रांतवाद करून आपल्यात जमत नसल्याचे विष पसरवले आहे. आमच्यात द्वेष नाही तर, एकजूट आहे. हे आपण दाखवून द्यावे. समाज हुशार झाला आहे. पक्ष की नेता यात आपली जात आणि मुलगा हेच मोठे आहेत, हे मराठ्यांना कळाले आहे.’’

‘ईडब्ल्यूएस’ का रद्द केले?’

सरकारने मुलींनी शिक्षण मोफत केल्याचे सांगितले, आता शुल्क घेत आहेत. मराठा समाजाला नको असलेले १० टक्के एसईबीसी आरक्षण देऊन १० टक्के ईडब्ल्यूएस रद्द केले. ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होते. जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअरसाठी एसईबीसीमध्ये सहा महिन्यांची मुदत दिली, अशी सवलत कुणबी, ‘ईडब्ल्यूएस’साठी दिली नाही. किती खोटारडेपणा कराल, असा प्रश्न जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला.

त्रास झाला तर दौरा थांबणार नाही - जरांगे

अंगात अशक्तपणा आहे. चक्कर येत आहे. डॉक्टर म्हणत होते, ‘सलाईन लावा.’ मी सांगितले संध्याकाळी उपचार घेतो. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत. कोल्हापूरपर्यंत डॉक्टरांची टीम सोबत असणार आहे. त्यांनी विश्रांतीचा सल्ला दिला. मी थांबणार नाही. कितीही त्रास झाला तरी दौरा पूर्ण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT