Maratha reservation leader Manoj Jarange-Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

महाद्वार रोड येथील संभाजी उद्यान येथे जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची जाहीर सभा झाली.

सकाळ डिजिटल टीम

''मराठा समाजामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात अधिक सभा घ्यावा लागत आहेत, ही मराठ्यांची ताकद असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घ्याव्या लागत आहेत.''

बेळगाव : पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागू नये, यासाठी एकजुटीने सीमाप्रश्नासाठी मैदानात उतरा, मात्र विजय झाल्याशिवाय माघारी फिरू नका, मराठा आरक्षणाप्रमाणेच (Maratha Reservation) सीमा प्रश्नासाठी (Belgaum Border Dispute) आरपारची लढाई सुरू करू या! महाराष्ट्र पाठीशी राहिला, तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.

महाद्वार रोड येथील संभाजी उद्यान येथे जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची जाहीर सभा झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे-पाटील यांनी एकदा शब्द दिला, की समोर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असले तरी माघारी हटत नाही.

बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाला पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही संघर्ष करत आहात. मात्र, येणाऱ्या काळात एकदा रस्त्यावर आला तर मागे फिरायचे नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरत असताना मरण डोळ्यासमोर ठेवून आंदोलनात उतरलो. गेल्या ७९ वर्षांपासून संघर्ष करूनदेखील समाजाला आरक्षण दिले जात नव्हते. मराठा समाजावर अन्याय करण्याची कारणे शोधत होतो. त्यानंतर आरक्षणाच्या मुळाशी जाऊन आंदोलनाला सुरुवात केली आणि सहा कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला.

अद्याप संघर्ष संपलेला नाही, येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांत मराठा उमेदवार उतरले जातील. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत मराठा उमेदवार फक्त मराठा समाजाच्या मतांवर निवडून येऊ शकतात. मराठा समाजाच्या प्रश्नाप्रमाणेच बेळगावचा प्रश्न देखील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, असे सांगितले जाते. त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून लढा उभारण्यासाठी एक परिषद घ्यावी लागेल. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत होते. मात्र, सहा कोटी गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू ठेवला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचे ९५ टक्के काम झाले आहे.

मराठा कुणबी कायदा होणे बाकी आहे, मात्र तो कायदा देखील लवकर करावा, यासाठी पुन्हा लढा हाती घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले, ‘एकाच वेळी अनेक प्रश्न हाती न घेता एक एक प्रश्न हाती घेऊन, प्रश्न सोडवू या. समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा करून या प्रश्नावर काय करता येईल, याबाबत परिषद घेऊया आणि लढायला सुरुवात करूया. मात्र, एकदा लढा सुरू केल्यानंतर मागे फिरायचे नाही. सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवणे गरजेचे असून संघटितपणे लढा दिला तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

जरांगे पुढे म्हणाले, ‘मराठा समाजामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात अधिक सभा घ्यावा लागत आहेत, ही मराठ्यांची ताकद असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घ्याव्या लागत आहेत, असा टोलाही त्यांनी सभेवेळी लगावला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी स्वागत, गुणवंत पाटील, रमाकांत कोंडुस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले.

मुद्दे आणि गुद्दे

भाषण कालावधी पस्तीस मिनिटे

  • १५ मिनिटे : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावर.

  • पाच मिनिटे : आंदोलन सुरू केल्यानंतर राजकर्ते आणि सरकारकडून कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.

  • १० मिनिटे : सीमा प्रश्नावर पुढे काय करावे लागेल.

  • २ मिनिटे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अधिक सभा घ्याव्या लागत आहेत.

  • ३ मिनिटे : आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातील युवकांना मिळत असलेल्या नोकरीबाबत.

सीमाप्रश्नाच्या माहितीची पुस्तिका

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमाप्रश्नाची संपूर्ण माहिती असलेली पुस्तिका आणि निवेदन जरांगे-पाटील यांना सादर करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, ॲड. एम. जी. पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT