कोल्हापूर - कौटुंबिक वादातून केर्लीमध्ये (ता. करवीर) विवाहितीने दोन मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शिल्पा नागेश चव्हाण (वय 28, रा, शिंगणापूर) असे या विवाहितीचे नाव आहे. मुलगी देवयानी (वय 8) आणि राजनंदिनी (वय 6) यांच्यासह विहिरीमध्ये उडी मारून जीव दिला. आज सकाळी या तिघींचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. या प्रकरणी करवीर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन चिमुरडींसह केलेल्या आत्महत्येमुळे गावात दिवसभर हळहळ व्यक्त केली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह 9 वर्षांपूर्वी शिंगणापूर येथील नागेश शिंदे यांच्या बरोबर झाला. शिल्पाचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले असून ती एका खासगी मॉलमध्ये नोकरी करत होती. नागेश यांचे पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. बुधवारी (ता.11) रात्री नागेश आणि शिल्पा यांच्यात वाद झाला. गुरुवारी (ता.12) सकाळी शिल्पा दोन मुलींसह माहेरी केर्ली येथे वडील मोहन शिंदे आणि आई छाया यांच्याकडे आली. शनिवारी (ता.14) दुपारी 3 वाजता ती देवयानी आणि राजनंदिनी यांच्या बरोबर घरातून बाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी न परतल्याने तिचे चुलतभाऊ एकनाथ आणि कृष्णात शिंदे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शिल्पा यांचा शोध घेतला. पण त्या मिळून आल्या नाहीत. रविवारी (ता.15) त्यांनी करवीर पोलीसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
हेही वाचा - धक्कादायक ! शिक्षकच करतोय खासगी सावकारी
आज (ता.16) सकाळी केर्लीमधील गजानन बापू चौगुले यांना यांच्या शेतातील विहीरीमध्ये तीन मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ करवीर पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे मृतदेह शिल्पा, राजनंदिनी आणि देवयानी यांचे असल्याचे गावातील काहीजणांनी ओळखले. यावेळी शिल्पाच्या आई, वडिलांना विहिरीजवळ बोलवण्यात आले. त्यांनी मतृदेहाची ओळख पटवून दिल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले.
नागेश आणि शिल्पा यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. यापूर्वी त्यांच्यात कधीच वाद झाला नाही. असे दोघांच्याही कुटुंबियांनी सांगितले. अद्याप कोणाचाही तक्रार न आल्याने पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.