Milk Production Business esakal
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा दूध व्यवसाय तोट्यात; पशुखाद्य, चारा, वीज, मजुरी, आरोग्यावरील खर्च आवाक्याबाहेर..

शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व्यवसाय (Milk Production Business) तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो.

पोपट पाटील

सरकी पेंड तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा, तसेच इंधन दरवाढीने वाहतूक महागल्याने दराने उच्चांक गाठल्याचे दुकानदार सांगत आहेत.

इस्लामपूर : गेली तीन वर्षे दूधदरात (Milk Price) दमडीचीही वाढ झालेली नसताना खाद्य, चारा, वीज, मजुरी, आरोग्यावरील खर्च वाढतच चालला आहे. यातच पशुखाद्यात आवाक्याच्या बाहेर दरवाढ झाल्याने दूध उत्पादकांचा हात रिकामाच असल्याची खंत व्यक्त होत आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व्यवसाय (Milk Production Business) तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो. बारमाही पाणी व उसामुळे ओल्या चाऱ्याची मुबलक उपलब्धता यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांचा (Farmers) उपजीविकेचे साधन बनला आहे. अनेक कुटुंबे पूर्ण वेळ व्यवसाय करीत आहेत. मात्र दिवसेंदिवस सरकी, गव्हाच्या भुस्स्याचे दर वाढतच चालल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सरकी पेंड तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा, तसेच इंधन दरवाढीने वाहतूक महागल्याने दराने उच्चांक गाठल्याचे दुकानदार सांगत आहेत. मात्र त्या प्रमाणात वर्षात दूधदरात मात्र वाढ झालेली नाही. दूध उत्पादकास गायीच्या दुधाला प्रतिलिटर २२ ते २५, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५० ते ५५ रुपये दर मिळत आहे. यातून खर्च वजा जाता ‘धन्याचे पोट गड्याला’ असा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.

पशुखाद्याचे दर वाढणार असतील तर गायीचे दूध प्रतिलिटर ३५ ते ४० व म्हशीचे दूध प्रतिलिटर ५५ ते ६० रुपये करा, अशी मागणी दूध उत्पादक करू लागला आहे. वाढत्या उन्हाचाही दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच ओला चारा कमी पडत असल्याने कडबा कुट्टीची मागणी वाढली आहे. पशुखाद्याचे वाढलेले दर, ओल्या-सुक्या चाऱ्याचा खर्च यांचा ताळमेळ घालताना शेतकऱ्याला नाकी नऊ आले आहे. याचा विचार करून शासनाने योग्य निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे.

दूध उत्पादन व खर्च म्हैस (दिवसाकाठी)

  • १० लिटर दूध - ५०० रुपये

  • ५ किलो खाद्य - २५० रुपये

  • ४० किलो ओला चारा - १२० रुपये

  • आजारपण, वीज, मजुरी - ५० रुपये

  • एकूण खर्च - ४७० रुपये

  • शिल्लक रुपये - ५० रुपये

म्हशीचा आठ महिन्यांच्या भाकडकाळातील खर्च विचारात घेतल्यास शेतकऱ्याचा पदरात केवळ शेणखत पडत असल्याचे वास्तव आहे.

पशुखाद्याच्या दरावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्याने दुधाचा व्यवसाय घाट्यात चालला आहे. दहा दिवसांचे दुधाचे बिल ४ हजार रुपये आले. खाद्याचे ३ हजार रुपये भागवले. गाय आजारी असल्याने तिला ५०० रुपये खर्च केले. हातात केवळ ५०० रुपये राहिले.

-संतोष पाटील, दूध उत्पादक शेतकरी, नेर्ले, ता. वाळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT