Gopichand Padalkar vs Sharad Pawar esakal
पश्चिम महाराष्ट्र

'शरद पवारांनी जातीजातींत भांडणं लावली, आता त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याची वेळ आलीये'; पडळकरांचा जोरदार निशाणा

MLA Gopichand Padalkar : मराठा विरुद्ध ओबीसी समाजात (Maratha vs OBC) वाद पेटवला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

''जो बिरोबाचा भंडारा आडवा लावतो, त्याची मांडणी आडवी असते. त्याच्या आडवा जो कोणी येईल त्याला आडवा करण्याची क्षमता आमच्याकडे आहे.''

ढालगांव : मराठा विरुद्ध ओबीसी समाजात (Maratha vs OBC) वाद पेटवला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. पवारांनी (Sharad Pawar) जातीजातींत भांडणे लावून महाराष्ट्रात वातावरण बिघडविण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला.

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा (Dhangar Samaj Dasara Melava) झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जो बिरोबाचा भंडारा आडवा लावतो, त्याची मांडणी आडवी असते. त्याच्या आडवा जो कोणी येईल त्याला आडवा करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. पवारांनी जातीजातीत भांडणे लावली आहेत. त्यामुळे शरद पवारांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. मताचा वापर करून घेणारे व फेकून देणारे आता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचा बनाव करत आहेत.

चाळीस वर्षे तुम्ही कुठे गेला होता. महाराष्ट्राची सत्ता बदलण्याची ताकत बहुजन समाजातील लोकांत आहे. तीन लाख ओबीसींना घरे देण्याच काम केले. ओबसींची उत्पन्नाची आठ लाख रुपयांची अट रद्द करून पंधरा लाख रुपये करण्याचा क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोणाशीही संघर्ष करण्याची तयारी ठेवा. धनगड असल्याचे पत्रक रात्रीत रद्द करण्याची कार्यवाही केली. दुसरे पत्रक काढले. कोणी पत्रक काढले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बी. के. कोकरेंचा ज्यांनी घात केला त्यांना गाडण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील बिरोबा भक्त हा वीर आहे. त्याच्यात लढण्याची क्षमता आहे. प्रस्थापित लोकांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्याग करायचा आहे. संधी मिळेल तिथे लढले पाहिजे. निवडणुकीत ज्यांची निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे. आशा बहुजन समाजाच्या पोराला पाठिंबा दिला पाहिजे. आपली लढाई अंतिम टप्प्यात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस संपत आले आहेत.

विजयादशमीची वाट पाहा. राज्यसरकारणे आता कशाचीही वाट न पाहता जीआर काढावा व त्याची अंमलबजावणी करावी.’ यावेळी जगन्नाथ जानकर, उत्तम चव्हाण, उल्लास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे यांची भाषणे झाली. यावेळी ब्रह्मानंद पडळकर, जगन्नाथ कोळेकर, राहुल कोळेकर, समाधान कोळेकर, रामचंद्र पाटील, रमेश कोळेकर, एन. टी. कोळेकर, काशिलिंग कोळेकर, भरमू कोळेकर यांच्यासह विविध भागांतून समाजातील लोकांनी उपस्थिती लावली होती.

MLA Gopichand Padalkar

प्रचंड जोश अन् उत्साह

आरेवाडी बनात दसरा मेळाव्यासाठी बाजूला पिवळे झेंडे लावल्याने रस्ते पिवळे झाले होते. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते व त्यावर एकही खुर्ची ठेवली गेली नाही. दसरा मेळाव्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड जोश अन् उत्साह पसरला होता. तसेच मेळाव्यासाठी काही ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT