पश्चिम महाराष्ट्र

आमदार प्रणिती शिंदें म्हणाल्या... प्लीज सगळं थांबवा आता.. 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आमदार प्रणिती शिंदे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी तर कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे व्यथित झाल्या आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिला पहिल्यांदा राजीनामा 
आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेसप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असून, त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात प्रणिती शिंदे यांचा समावेश नक्की असल्याची खात्री सर्वांनाच होती. मात्र त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे सर्वांचाच अपेक्षाभंग झाला. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी याचा निषेध म्हणून सर्वात आधी नगरसेवकपदाचा शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, त्यानंतर इतर पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले. 

......आणि आंदोलन पेटले 
जो पर्यंत प्रणिती शिंदे यांचा समावेश मंत्रीमंडळात होत नाही, तोपर्यंत प्रदेश कॉंग्रेस समितीने सूचना केलेल्या एकाही कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची नाही, प्रसंगी कॉंग्रेस भवन बंद ठेवू असा इशाराही देण्यात आला. प्रणितींना डावलल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. शिंदे यांचा समावेश न होण्यामागे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा हात असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही झाली. 

सर्वात आधी हे वाचा... राजीनामे काय देताय, मुंबईला जाऊ 

दिखाऊगिरी सुरु असल्याची टिका 
राजीनामे द्यावेत की नाही याबाबत दोन मतप्रवाह होते. राजीनामे दिल्यास पक्ष अडचणीत येईल, त्यापेक्षा पदाधिकाऱ्यांना भेटू, प्रसंगी दिल्ली गाठू आणि श्रेष्ठींमार्फत मंत्रीपद आणू असे काहीजणांचे मत होते. राजीनामे दिल्याशिवाय श्रेष्ठी दखल घेणार नाहीत, त्यामुळे शहराध्यक्ष, महिला आघाडी पदाधिकारी व नगरसेवकांनीही त्यांचे राजीनामे द्यावेत. नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे न देता ते महापालिका आयुक्तांकडे द्यावेत, अशीही मागणी पुढे आली. स्थानिक पातळीवर दिखाऊगिरी करण्याची धडपड सुरु असल्याची टीका सुरु झाली, त्यातच श्री. खर्गे यांचा पुतळा जाळल्याबद्दल कॉंग्रेसच्या सर्वस्तरावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर आमदार शिंदे यांनीच याबाबत पुढाका घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT