विशाल पाटील यांच्या नावावर एकमत झाले आहे, असे वरिष्ठ नेते सांगत आहेत. विशाल पाटील यांनीही तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली : खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना लोक स्वीकारणार नाहीत. खांद्यावर हात टाकून मते मिळवण्याचा पॅटर्न आता चालणार नाही, असा टोला काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) यांनी लगावला. सांगली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या इच्छुक पाच लोकांची नावे ठरवण्यासाठी आज बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
सांगली लोकसभा मतदार संघातून (Sangli Loksabha Constituency) लढू इच्छिणाऱ्या पाच नावांची यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासह आणखी चार नावांचा त्यात समावेश करावा लागणार आहे. ती नावे कुणाची असावीत, यावर पक्षात खल सुरू आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यावर बैठकीत चर्चा केली. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चेनंतर यादी पाठवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसने जिल्ह्यातील लोकसभा लढवून इच्छिणाऱ्यांच्या नावांची यादी मागवली होती. त्यावेळी यादी पाठवताना विशाल पाटील यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा नावाचाही समावेश करण्यात आला होता. आता लढाई तोंडावर आहे. यादी पाठवल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, अशी काळजी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. विशाल पाटील यांच्या नावावर एकमत झाले आहे, असे वरिष्ठ नेते सांगत आहे. विशाल पाटील यांनीही तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.
अशावेळी काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून पुन्हा यादी मागवण्यात आल्याने नेते संभ्रमात आहेत. विशाल यांचे नाव निश्चितपणे पाठवले जाईल, मात्र सोबतीला अन्य नावे पाठवताना गोंधळ माजवणारा संदेश बाहेर जाऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. आमदार विश्वजित कदम यांचा सल्ला घेऊन अन्य नावांवर एकमत होणार आहे.
विक्रम सावंत म्हणाले, ‘‘काँग्रेसकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचे ताकदीने काम करू. गेल्यावेळी कमी मते मिळाली, मात्र खांद्यावर हात टाकण्याचा पॅटर्न चालणार नाही. काँग्रेस ताकद दाखवेल.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.