Water Storage in Koyna Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात 'इतका' TMC पाणीसाठा; महाबळेश्वरात 1 हजार 769 मिमी पावसाची नोंद

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते.

चिपळूण : कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत २७३ मिमी पाऊस झाला आहे. कोयना धरणातील आवक कमी असली तरी पाणीसाठा ४५.१६ टीएमसीवर पोहोचला आहे. धरण अजून ५० टक्केही भरलेले नाही.

जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मागील आठवड्यातील पावसाची उघडझाप चिंता वाढवणारी होती. शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. कास, बामणोली, तापोळासह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने (Mahabaleshwar Rain) झोडपले नंतर पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र बुधवारपासून पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. कोयनानगर येथे ८ मिमी पाऊस झाला होता. १ जूनपासून आतापर्यंत १ हजार ९९० मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात २ हजार ३१९ मिमी पाऊस झाला. महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आवकही कमी झाली होती.

गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढला आहे. कोयना येथे ८६ मिमी पाऊस झाला. नवजा येथे ११६ तर महाबळेश्वर येथे ७१ मिमी पाऊस झाला. गुरूवारी सकाळच्या सुमारास सुमारे २१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ४५.१६ टीएमसी इतका झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT