Belgaum Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

विहिरीत उडी घेऊन आईनं 17 महिन्याच्या चिमुरड्यासह संपवलं जीवन; कोवळ्या जीवाला पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही मृतदेह पाहून पाहुणे व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. कोवळ्या बालकाला घेऊन आत्महत्या केल्याने उपस्थित हळहळत होते.

चिक्कोडी : घरातील भांडणातून महिलेने मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १) मांगनूर (ता. चिक्कोडी) येथे उघडकीस आली. गायत्री रावसाहेब वाघमोरे (वय २६) व कुशल वाघमोरे (१७ महिने) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून (Chikkodi Police) मिळालेली माहिती अशी, रावसाहेब वाघमोरे हे कुटुंबासह मांगनूर येथे शेतातील घरात राहतात. सहा वर्षांपूर्वी रावसाहेब व गायत्री यांचा विवाह झाला होता. त्यांना १७ महिन्यांचे मूल होते. कौटुंबिक भांडणातून गायत्री यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात असलेल्या पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत आपल्या लहान मुलासह उडी घेतली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच चिक्कोडी पोलिस, संकेश्वर आग्निशामक दलाच्या जवान व गावकऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी गावातील लोकांनी गर्दी केली होती. दोन्ही मृतदेह पाहून पाहुणे व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. कोवळ्या बालकाला घेऊन आत्महत्या केल्याने उपस्थित हळहळत होते. दोन्ही मृतदेह चिक्कोडी सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळी चिक्कोडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. सध्या कौटुंबीक भांडणातून हे आत्महत्येचे प्रकरण घडले असले तरी याबाबत स्पष्ट माहिती तपासातून पुढे येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गायत्री यांचे माहेर पोलिसांकडून समजलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane: संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांची प्रतिक्रिया

Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT