Nipani Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

भिमनगरातील उर्दू हायस्कूलजवळ सराईत गुंडाचा निर्घृण खून; अशरफअलीचे दोन्ही हात मनगटापासून तुटले

सकाळ डिजिटल टीम

हल्लेखोर टोळक्याने धार-धार हत्याऱ्याने अशरफअली यांच्या डोक्यावर व दोन्ही हातावर वर्मी वार केल्यामुळे त्यांचे दोन्ही हात मनगटापासून तुटलेले होते.

निपाणी : निपाणीत एक मोठी घटना घडली आहे. गुंड अशरफअली नगारजीविरोधात निपाणी तसेच विटा (जि. सांगली) अशा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खून, चेनस्नॅचिंग, चोरी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. गुन्हेगार अशरफअलीखा ऐन नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) पूर्वसंध्येला खून झाल्याने निपाणी शहरात एकच खळबळ उडालीये. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गुंड अशरफअली नगारजी (Ashraf Ali Nagarji) याच्या वाढत्या गुन्हेगारीची निपाणी पोलिसांनी (Nipani Police) गांभीर्याने दखल घेतली होती. त्याच्याविरोधी तडीपारचा प्रस्ताव तयार करून त्याला गेल्यावर्षी निपाणीतून तडीपार केले होते. जुलै महिन्यात तडीपारची मुदत संपल्याने तो पुन्हा निपाणीत राहण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याची काही तरुणांबरोबर वादावादी झाली होती.

Nipani Crime

उपचारापूर्वीच झाला मृत्यू

या घडल्या प्रकारानंतर त्याच्यावर तरुणांचे टोळके चिडून होते. तो बुधवारी रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास निपाणीमधील भिमनगरातील म्युन्सिपल उर्दू हायस्कूल येथे आला होता. यावेळी दुचाकीवऊन आलेल्या तरुणाच्या टोळक्याने त्याला गाठले. त्यांच्यावर अचानक हत्याराने खूनी हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. पण, त्याची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अशरफअलीच्या डोक्यावर, हातावर वर्मी वार

हल्लेखोर टोळक्याने धार-धार हत्याऱ्याने अशरफअली याच्या डोक्यावर व दोन्ही हातावर वर्मी वार केल्यामुळे त्यांचे दोन्ही हात मनगटापासून तुटलेले होते. या घडल्या प्रकाराची माहिती निपाणी शहर पोलिसांना समजली. त्यांनी त्वरित घटनास्थळी व कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. अशरफअलीचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्याच्या नातेवाईकासह मित्रमंडळीनी धाव घेतली. या खुनाच्या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर पोलीस चौकीत झाली असून, याचा पुढील तपास निपाणी शहर पोलीस करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

Kolhapur: नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

SCROLL FOR NEXT