Murlikant Petkar Interview  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Murlikant Petkar Interview : त्या वेळी लोक हसले, म्हणून ‘चंदू चॅम्पियन’ मिळाला मुरलीकांत पेटकरांनी मुलाखतीत उलगडले रहस्य

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : ‘‘खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले. त्यानंतर भावाने जल्लोष बघायला इस्लामपूरहून कऱ्हाडला सायकलवरून नेले. तेव्हा ठरवले, खेळातच काही तरी करायचे. तिथे मला विचारल्यावर, मी चॅम्पियन होणार, असे सांगितले. यावेळी लोक हसले आणि चंदू चॅम्पियन म्हणू लागले.’’ असा किस्सा भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी सांगितला.

विलिंग्डन महाविद्यालय आणि तानाजी सावंत फाउंडेशन यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात आज मुलाखत झाली. प्राचार्य डॉ. शर्मिष्ठा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, मनसेचे जिल्‍हाप्रमुख तानाजी सावंत, शीतल गोर्डे यांनी मुलाखत घेतली. यावेळी अर्जुन पेटकर, आर. जे. पाटील, डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी पेटकर यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवण्यात आला.

मुरलीकांत पेटकर म्हणाले, ‘‘लहानपणी यात्रेत कामेरीच्या सरपंचांच्या मुलालाच चितपट केले. त्यावेळी सरपंचाचे मेहुणे गणपती खेडकर यांचे नाव घेऊन त्यांचा पठ्ठ्या असल्याचे सांगत शड्डू ठोकल्याने मारामारी सुरू झाली, त्यानंतर तिथून पळून गेलो.

नुरा कुस्तीला मी भुललो नाही, त्यामुळे विजयी झालो. चिरमुरे-बस्तासे मिळायचे, तेव्हा एक पैशाची कुस्ती मी जिंकलो. धनगर समाजाच्या एका व्यक्तीने माझ्यासाठी घोंगडीवर पैसे जमा केले. त्यात मिळालेला एक पैसा हेच माझे पहिले पदक आहे.

घोंगडीवरील पैसे ट्रक चालकाजवळ दिले आणि पुण्याला सोडायला सांगितले. तिथे आत्या राहते एवढेच माहिती होते. पुण्यात उतरलो, तिथेच धोबी घाटावर रडत उभा होतो. एका महिलेने मला घरी नेले. तीन वर्षे सांभाळले. धोबी असल्याने तिने धुवायला आलेल्या पोरांची कपडे मला वापरायला दिली. तिला मी अव्वा म्हणायचो.’’

‘‘पुण्यात एकदा मला आईने ओळखले. आत्याच्या नवऱ्याच्या मित्राने लष्कराच्या भरतीबद्दल सांगितले. भरती झाल्यावर सरकार पैसे देत होते. त्यामुळे तिथे गेलो. तिथे शाळेत काय खेळायचे म्हणून हॉकी निवडले. मात्र, प्रांतवादातून कर्नाटकच्या लोकांनी संधी नाकारली. मी रडलो. त्यावेळी एकाने बॉक्सिंग या वैयक्तिक प्रकाराची निवड करण्याचा सल्ला दिला. तिथे नावलौकिक आणि पदके मिळवली,’’ असे पेटकर यांनी सांगितले.

चित्रपटात केवळ मुरलीकांत पेटकर यांचा ६० टक्के भाग दाखवण्यात आला आहे. ४० टक्के भाग अद्याप बाकी आहे, असे मुरलीकांत पेटकर यांचा मुलगा लष्करात कार्यरत असलेले अर्जुन पेटकर यांनी सांगितले. तसेच वडिलांच्या नावाने २०१६ मध्ये संकेतस्थळ बनवले. त्याची माध्यमांनी दखल घेतली. त्याची दखल घेत केंद्र सरकारने २५ जानेवारी २०१८ ला ‘पद्मश्री’ मिळाला.

वैद्यकीय गरजेसाठी जलतरणाला सुरवात

एकोणिसाव्या वर्षी शरीरात ९ गोळ्या घुसल्या, त्यातील ८ गोळ्या काढल्या. डॉ. मेहता यांनी सांगितल्यानंतर शारीरिक गरज म्हणून जलतरणाला सुरवात केली. वैद्यकीय गरज म्हणून सुरू झालेला जलतरणचा प्रवास सुवर्णपदकांपर्यंत घेऊन गेला.

युद्धात पायाने अधू झालेल्या पेटकर यांनी ‘माश्यांनाही पाय नसतात, तरी ते पोहतातच,’ हे वाक्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विजय मर्चंट यांनी जावळे यांना मला प्रशिक्षण देण्यासाठी सांगितले. त्यांनीही जपान, अमेरिकेच्या वेळेत म्हणजे आपल्याकडील पहाटेच्यावेळी जलतरणाचा सराव करवून घेतला. त्याचेच फळ मिळाल्याचे पेटकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT