शिराळा परिसरात पोलिस आणि वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ४०० पेक्षा अधिकचा फौजफाटा तैनात केला आहे.
शिराळा : सांगलीतील शिराळा तालुक्यात (sangli, shirala) उद्या नागपंचमी साजरी होत आहे. मात्र यंदा या सणावर पोलिस व वनविभागाची करडी नजर असणार आहे. यादरम्यान लोकांच्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाणार आहे. (nag panchami 2021) यासाठी शिराळा परिसरात पोलिस आणि वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ४०० पेक्षा अधिकचा फौजफाटा तैनात केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शिराळा कडकडीत बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
मोजक्याच लोकांसमवेत मानाची पालखी विनावाद्य निघणार आहे. बाहेरील लोकांना शिराळा येथे येण्यास बंदी घातली असून त्यासाठी प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळा रहिवासी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणार आहेत.
नागपंचमी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona) जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर करून काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १४ ऑगस्टच्या सकाळी ८ पर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळ्यात येण्यास बंदी घातली आहे. (lockdown) लॉकडाऊच्या नियमाचे पालन करून मंदिर परिसरात धार्मिक विधी होणार असून पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसाठी दहा व्यक्तींना पास देण्यात आले आहेत. अंबामाता मंदिर नागरिकांसाठी बंद राहणार असून धार्मिक विधीसाठी ध्वनीक्षेपक व वाद्यास बंदी घालण्यात आली आहे.
शिराळा येथील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरुन पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करू नये. दूध, दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व सेवा १३ ऑगस्टला बंद राहतील. सादर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. ६५ नाग मंडळाच्या १४९ अध्यक्ष व कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी व्हावी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ११ पोलिस अधिकारी, १७५ पोलिस कर्मचारी, २० वाहतूक पोलिस, १९महिला पोलिस कर्मचारी, पाच व्हिडीओ कॅमेरे, दोन ध्वनी मापक यंत्र, दोन दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिराळा शहरातील प्रमुख मार्गासह पालखी मार्गावरही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुन्हे दाखल असणाऱ्या शहरातील १० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाने कडक बंदोबस्त ठेवला असून यामधे सहायक वनसंरक्षक दर्जाचे ४ अधिकारी, वनक्षेत्रपाल १८, वनपाल ३०, वनरक्षक ५० यांचा समावेश आहे. सोबतच २ ड्रोन कॅमेरे, ६ व्हिडिओ कॅमेरे, १० गस्ती पथक, ६ फिरती पथके, १ श्वान पथक असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.