पश्चिम महाराष्ट्र

भोजापूर धरण अखेर 'ओव्हरफ्लो'

हरिभाऊ दिघे

तळेगाव भागाच्या आशा पल्लवित ; लाभक्षेत्रात सर्वत्र आनंद

तळेगाव दिघे ( जि. नगर) - सिन्नर व संगमनेर तालुक्यातील गावांना वरदान ठरलेले ४७५ दशलक्ष घनफुट क्षमतेचे भोजापूर धरण अखेर जोरदार पावसाने मंगळवारी सायंकाळी 'ओव्हरफ्लो' झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. भोजापूरच्या पूर पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तळेगाव - निमोण भागातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

भोजापूर धरण 'ओव्हरफ्लो' झाल्यानंतर सांडव्यावरून पडणारे पाणी प्राधान्यक्रमाने म्हाळुंगी नदीत सोडण्यात आले आहे. त्यानंतर लाभक्षेत्रातील पूर चाऱ्यांना पाणी सोडणे अपेक्षित आहे. सदर धरणाचा फायदा सिन्नर तालुक्यातील पूर्वेकडील गावांना तसेच संगमनेर तालुक्यातील निमोण पट्टयातील गावांना होतो. सिन्नरला ६५ तर संगमनेरला ३५ टक्के असे धरणाचे पाणी वाटप आहे. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर नंतर निमोण परिसरातील बंधारे पाण्याने भरले जातात. तसेच या परिसराला आवर्तनाचाही लाभ मिळतो. भोजापुरचे पाणी मिळावे अशी तळेगाव भागातील दुष्काळपिडीत शेतकरी वर्षानुवर्षे मागणी करीत आहेत. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तळेगाव भागात तिगाव माथ्यापर्यंत भोजापूर पुरचारीचे काम करण्यात आले. मात्र सोनुशी परिसरात प्रलंबित असलेले काम टेलपर्यंत पूरपाणी पोचण्यास अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास तळेगाव - निमोण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पूरपाणी मिळू शकेल.

दुष्काळी गावांना पाणी मिळावे 
भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा फायदा निमोण भागाला मिळणार आहे. निमोण - तळेगाव भागातील दुष्काळी गावांना लाभ मिळण्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी प्राधान्याने पूरचारीत सोडण्यात यावे.
- इंजि. हरिष चकोर, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT