Nana Patole says Its Brahma-Vishnu-Mahesha Government in the state 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात ब्रह्मा-विष्णू-महेशाचे सरकार : नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : ""सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा प्रभाव असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संयमी व शांत स्वभावामुळे सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले आहेत. हे तीन पक्षांचे नव्हे, तर ब्रह्मा-विष्णू-महेशांचे सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना, जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेची कामे सरकारकडून करून घेणार आहे,'' अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात पटोले अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतर्फे सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार राजीव खांडेकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गिरीश गांधी यांना आणि सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, डॉ. किरण लहामटे व हिरामण खोसकर, माजी आमदार मोहन जोशी, कल्याण काळे, उद्योजक राजेश मालपाणी आदी उपस्थित होते. 

पाच वर्षे सत्तेत राहणार

पटोले म्हणाले, ""राजकारणातील आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला, तरी मी जनतेचा प्रतिनिधी आहे. विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या हिताची कामे करून घेण्याला माझे प्राधान्य राहील. हे सरकार जनतेच्या विश्वासाला निश्‍चित पात्र ठरून, पाच वर्षे सत्तेत राहणार आहे.'' 

नम्रता थोरातांच्या यशाचे गमक

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर गेल्याचे गौरवोद्‌गार काढले. ""शेतीप्रधान देशातील नागरिकांच्या हिताचे नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा व लोकसभेत शेतकऱ्यांची मुले गेली पाहिजेत. नम्रता व जनमानसाच्या हृदयातील स्थान थोरातांच्या यशाचे गमक असून, तरुण राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

थोरात राजकारणातील राम

शांत, संयमी व सुसंस्कृत स्वभावाचे असल्याने, सर्वांना सोबत घेऊन विकासाचा ध्यास घेतलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राजकारणातील राम आहेत, अशा शब्दांत खांडेकर यांनी थोरात यांचा गौरव केला. मंत्री थोरात यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. माधवराव कानवडे यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT