Narayan Patil will get the big post 
पश्चिम महाराष्ट्र

नारायण पाटलांना शिवसेनेकडून लवकरच मिळणार मोठे पद?

अशोक मुरुमकर

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करुन अपक्ष रिंगणात उतरलेले करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेकडून मोठी संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच पाच सदस्य असताना सुद्धा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आलेल्या उमेदवारांला अध्यक्षपद मिळवून दिले. त्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करुन अध्यक्षांचा सुद्धा सत्कार केला आहे. लवकरच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे विश्‍वासनीय सुत्राने सांगितले आहे. जिल्ह्यात आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्याविरुद्ध एक गट सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. तशा बैठकाही झाल्या आहेत, आणि ते पाटील यांच्याच माध्यमातून शिवसेना सक्रिय करण्याचे ठरल्याचे सांगित आहेत.

हेही वाचा : सोलापुरात झळकले आणखी एक वेगळे पत्रक
पाच सदस्य असतानाही सत्ता...

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या होत्या. मात्र दोन्ही वेळी त्यांना अध्यक्षपद ताब्यात घेता आले नाही. यावेळी महाविकास आघाडीचा पॅटर्न चालेल अशी शक्यता होती. मात्र, महाविकास आघाडीची खेळी अयशस्वी झाली. अन्‌ धक्कादेत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचे अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष झाले. कांबळे हे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. पाटील हे मोहिते पाटील यांना मानणारे आहेत. भाजपच्या सदस्यांसह समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक यांच्या समविचारी आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी कांबळे यांना अध्यक्ष निवडणुकीत मदत केली.

हेही वाचा : अजित पवार म्हणतात राजकारणात शब्दाला महत्त्व नसते?
तालुक्यात दोन नंबरची मते...

२०१४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी तालुक्यात विविध कामे केली. त्यावेळी जिल्ह्यात ते शिवसेनेचे एकमेव आमदार होते. पुढे त्यांनी करमाळा पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील चार गटांमध्ये विजयी मिळवाला. २०१९ च्या निवडणुकीत आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या करमाळा तालुक्यातील नेत्या रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अन्‌ शिवसेनेची त्यांना उमेदवारी मिळाली. त्यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत अपक्ष रिंगणात असलेले संजय शिंदे हे विजयी झाले. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष लढलेले माजी आमदार पाटील व शिवसेनेकडून लढलेल्या बागल तिसऱ्या क्रमांकावर गेल्या.

हेही वाचा : का दिल्या एकनाथ शिंदे यांनी झेडपी अध्यक्ष कांबळे यांना शुभेच्छा
शिवसेनेशी जवळीक...

निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकिय चित्र बदलले आणि अनेपेक्षीतपणे धक्का देणारे चित्र घडत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करुन भाजपला रोखले. दरम्यान नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात माजी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाविद्यालय स्थापन करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्यांची ही मागणी आमदार असल्यापासूनची आहे. त्यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवून कार्यकर्तेही पाटील यांनी शिवसेना सोडली नसल्याचे सांगत आहेत. यामुळे मात्र त्यांचे विरोधक अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. पाटील हे शिवसेनेवर दाखवत असलेली निष्ठा आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर मिळवलेली सत्ता यामुळे त्यांना शिवसेना कोणते तरी पद देईल, अशी आशा व्यक्त करत आहेत. 

पाटीलांची अनुपस्थिती...
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. तेव्हा त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांना आपण सोलापूरला विकासासाठी मदत करणार असल्याचे अश्‍वासन दिली. यावेळी माजी आमदार पाटील यांचे समर्थक करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, करमाळा पंचायत समितीचे सदस्य शिवाजी बंडगर उपस्थित होते. मात्र, माजी आमदार पाटील अनुपस्थित होते. 

बाजार समितीही पाटलांकडेच?
करमाळा बाजार समितीत पाटील यांच्याकडून निवडून आलेले प्रा. शिवाजी बंडगर हे सभापती निवडीवेळी बागल गटाकडे गेले. त्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडील अनेक वर्षांपासून असलेली सत्ता गेली. पुढे काही दिवसाताच प्रा. बंडगर हे पाटील यांच्या गटात गेले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT