Sahyadri tiger project Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेची पर्वणी!

निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील मचाणावर चांदण्या रात्री यंदा वन्यजीव पाहता येणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

शिराळा - ‘निसर्ग अनुभव कार्यक्रम २०२२’ अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोमवारी (ता. १६) बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावरील वन्य प्राणिगणना होणार आहे. त्यानिमित्ताने वन्यजीवप्रेमी; तसेच निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील मचाणावर चांदण्या रात्री यंदा वन्यजीव पाहता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीची प्राणिगणना करता आली नाही; मात्र यावर्षी निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यांवरील प्राण्यांची गणना करता येणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. उन्हाळ्यामध्ये जंगलातील बहुतांश पाणवठे कोरडे असतात, काही ठराविक पाणवठ्यांवरच पाणीसाठा असल्याने वन्य प्राणी तेथे पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा पाणवठ्यांवर लाकडी मचाण बांधण्यात येतात. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होऊ शकते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश होतो. चांदोली राष्ट्रीय उद्यानांतर्गत चांदोली, हेळवाक, ढेबेवाडी या परिक्षेत्राचा समावेश आहे; तर कोयना वन्यजीव अभयारण्यात कोयना व बामणोली या परिक्षेत्रांचा समावेश होतो. दोन्ही संरक्षित क्षेत्रात मिळून एकूण ५० मचाण उपलब्ध करून निसर्गप्रेमींच्या मदतीने प्राणिगणना करण्यात येणार असल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. एस. लडकत यांनी सांगितले.

चांदोलीतील वन्यवैभव ...

व्याघ्र प्रकल्पात वाघ, गवा, बिबटे, साळिंदर, रानडुक्कर, हनुमान वानर, पिसोरी, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चौसिंगा, भारतीय ससा आदी प्राणी आढळतात. या प्राण्यांबरोबरच ‘सह्याद्री’त पक्ष्यांच्याही अनेक प्रजाती पाहावयास मिळतात. पश्चिम घाटात आढळणाऱ्या पाचशे पक्ष्यांच्या प्रजातींपैकी २७५ प्रजातींचा येथे अधिवास आहे. महाधनेश, समुद्री गरुड, कापशी घार, गिधाड, पारवा, निलगिरी, खवलेदार होला, पाचू, कवडा, पिवळ्या पायाची हरोळी, राखी रानकोंबडा, भारतीय करवानक आदी पक्षिवैभव आढळते.

५० मचाणांवरून प्राणी गणना

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सोमवारी (ता. १६) होणाऱ्या प्राणी गणनेसाठी उपलब्ध ५० पैकी प्रत्येक मचाणावर एक वन कर्मचारी व दोन स्वयंसेवक अशी तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राणिगणना होणार असून, मंगळवारी (ता. १७) सकाळी १० वाजता समारोप होणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती एकत्रित करून प्राण्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT