Miraj Chord Line Railway Station esakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत होणार नवे कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन; तिरुपती, धनबादसह सोलापूरकडं धावणाऱ्या गाड्यांची 30 मिनिटं वाचणार

पुणे विभागातील (Pune Division) दौंड कॉर्डलाईनसारखेच मिरजेतही रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नव्या कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनमुळे गाड्यांचा वेळ अर्धा तास वाचणार असून मिरज जंक्शनवरील गाड्यांचा ताण कमी होणार आहे.

मिरज : येथील कृष्णाघाट रोडवर (Krishna Ghat Road) नवे मिरज कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन (Miraj Chord Line Railway Station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मिरज जंक्शनवरील गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी होणार असून तिरुपती, धनबाद, नागपूरसह सोलापूर आणि दक्षिणेत जाणाऱ्या गाड्यांचा तीस मिनिटे वेळ वाचणार आहे. शिवाय मालवाहतुकीसही गती मिळणार आहे.

पुणे विभागातील (Pune Division) दौंड कॉर्डलाईनसारखेच मिरजेतही रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागेची पाहणी आणि सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर, बेळगाव आणि सोलापूर हे तीन रेल्वे मार्ग जोडण्यासाठी कृष्णाघाट रोडची जागा निवडण्यात आली आहे. येथून सहजरीत्या बेळगाव, सोलापूर आणि कोल्हापूर हे तीन रेल्वे मार्ग मिरज कॉर्ड लाईन स्टेशनला जोडले जोणार आहेत.

सध्या मिरजेतून प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या ६४ गाड्या धावतात. यामधील कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-नागपूर आणि कोल्हापूर-कलबुर्गी गाड्यांना मिरज जंक्शनमध्ये (Miraj Junction) येऊन इंजिनची अदलाबदल करूनच पुढे जावे लागते. यामध्ये प्रत्येक गाड्यांचा किमान १५ ते ३० मिनिटे वेळ जातो. या कॉर्ड लाईन स्टेशनमुळे या वेळेत बचत होणार आहे. तसेच सोलापूर, बेळगावहून येणाऱ्या मालगाड्यांना कोल्हापूर अथवा सोलापूर, बेळगावकडे मार्गस्थ करायचे झाल्यास पुन्हा मिरज जंक्शनमध्ये इंजिनची अदलाबदल करावी लागते. तीही समस्या यामुळे सुटणार आहे.

सध्या मिरजेतून पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि सोलापूरकडे पंधरा पॅसेंजर, पंचवीस एक्स्प्रेस आणि पंचवीस मालवाहतूक गाड्या धावतात. कृष्णाघाट रोडवरील या नव्या स्टेशनमुळे कोल्हापूर आणि बेळगाव सोलापूर या तीन रेल्वे लाईन एकाच ठिकाणाहून जोडल्या जाणार आहेत. यासाठीच्या कामाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता रेल्वे सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

त्यानंतर लवकरच प्रत्यक्षात कामास सुरवात होणार आहे. त्यामुळे मिरजेतून बेळगाव आणि सोलापूर आणि कोल्हापूरकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा तीस मिनिटे वेळ वाचणार आहे. शिवाय बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर येथून धावणाऱ्या मालगाड्या थेट कॉर्ड लाईन स्टेशनवरून कमी वेळेत मालांची वाहतूक पूर्ण करणार आहेत.

नव्या कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनमुळे गाड्यांचा वेळ अर्धा तास वाचणार असून मिरज जंक्शनवरील गाड्यांचा ताण कमी होणार आहे. हा रेल्वेकडून प्रस्तावित प्रकल्प आहे. त्या कामाच्या ठिकाणासह अन्य गोष्टींची पूर्तता करण्यात आली असून, रेल्वे कृती समितीकडून नवे कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन लवकरात लवकर होण्यासाठी पाठपुरावा करू.

-मकरंद देशपांडे, अध्यक्ष, रेल्वे कृती समिती, मिरज

कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनचा होणार या गाड्यांना लाभ

कोल्हापूर-तिरुपती (हरिप्रिया एक्स्प्रेस), कोल्हापूर-धनबाद (दीक्षाभूमी एक्स्प्रेस), कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-कलबुर्गी, यशवंतपूर-पंढरपूर, मिरज-लोंढा, मिरज-हुबळी, मिरज कॅसलरॉक

मिरजेतून धावणाऱ्या गाड्यांची संख्या

  • पॅसेंजर 15

  • एक्स्प्रेस 25

  • मालवाहतूक गाड्या 25

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT