राहाता : ""वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया एकाच वेळी कार्यरत असल्याचा हा काळ आहे. इंटरनेट मीडियाद्वारे उत्पन्न मिळू शकत नाही आणि अन्य दोन्ही माध्यमांना मर्यादा आल्या आहेत. या तिन्ही माध्यमांवर हुकमत चालवू शकतील तेच पत्रकार आगामी काळात टिकतील,'' असे मत अर्थ व माध्यमतज्ज्ञ डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.
उद्योजक नरेश राऊत फाउंडेशन व राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य इंद्रभान डांगे अध्यक्षस्थानी होते.
हेही वाचा- राहुरी तालुक्यात चोरांचा धुमाकूळ
"सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील, विकास अंत्रे, विष्णू वाघ, फाउंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, पंकज लोढा, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजय पारख, शिर्डीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन व राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन कापसे, ऍड. अनिल शेजवळ, दशरथ तुपे, किरण वाबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा- छेड काढणाऱ्यांना दिली अनोखी शिक्षा
आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी सामाजिक पर्यटन हा चांगला पर्याय होऊ शकेल, असेही डॉ. निरगुडकर म्हणाले.
राहाता तालुका प्रेस क्लब जिल्ह्यात आघाडीवर
डॉ. बोठे पाटील म्हणाले, ""वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात राहाता तालुका प्रेस क्लब जिल्ह्यात आघाडीवर आहे. सामाजिक बांधिलकी व पत्रकारिता यांची सुरेख सांगड येथे पाहायला मिळते. त्यामुळे या प्रेस क्लबचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळताना आनंद व समाधान वाटते.''
ग्रीन ऍण्ड क्लीन शिर्डी ग्रुपचा गौरव
शिर्डीतील ग्रीन ऍण्ड क्लीन शिर्डी ग्रुपचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार ऍड. सागर हिवाळे व सचिन बनसोडे यांनी मानपत्र वाचन केले. पत्रकार दिलीप खरात यांनी आभारप्रदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.