भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगलीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू," असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे. लव्ह जिहादच्या तक्रारी अर्ध्या तासात घेतल्या पाहीजेत, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. काल सांगलीच्या पलूस येथे शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नितेश राणे म्हणाले, "सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू," असा धमकीचा इशारा राणे यांनी पोलिसांना दिला. "मी निवेदन वगैरे देत नाही, ती भाषा मला जमत नाही, मी थेट कार्यक्रम करतो," असेही ते म्हणाले.
नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
"पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील," असे ते म्हणाले होते.
"आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो," असेही ते म्हणाले होते.
नितेश राणे यांचे हे वक्तव्य पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे आणि विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.