Sangli District Central Bank esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank : सांगली सहकारी बँकेचे तब्बल 50.58 कोटींचे नुकसान; आजी-माजी संचालकांसह 41 जणांना नोटीस

सकाळ डिजिटल टीम

जिल्हा बॅँकेच्या नुकसानीस आजी-माजी संचालक जबाबदार नाहीत. ही चौकशी चुकीची आहे. नोटीस मिळताच सहकार मंत्र्यांकडे अपील केले जाईल.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे (Sangli District Central Bank) ५०.५८ कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बॅँकेच्या आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांसह ४१ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. २७ जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांनी नोटिसा दिल्या आहेत.

बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या (Board of Directors) काळात झालेल्या काही निर्णयांबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित तक्रारीत तथ्य आढळल्याने तत्कालीत संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार प्रकरणांत बॅँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजारांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे.

नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलम ८८ अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांच्या खरेदीत १.९७ कोटी, जिल्ह्यातील ७६३ विकास संस्थांच्या संगणकीकरणावर अनावश्यक खर्च १४.६७ कोटी, नॉन बॅँकिंग अस्‍सेट खरेदीत चुकीचा जमाखर्च २२.४२ कोटी तसेच महांकाली कारखान्याची शिल्लक व खराब साखर विक्रीत ११.५१ कोटी असे नुकसान झाल्याचा ठपका आहे. २७ जून रोजी कोल्हापूर येथील उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून यावेळी स्वत: अथवा वकील, प्रतिनिधीच्या माध्यमातून सबळ लेखी कागदोपत्री खुलासा सादर करण्यात सांगण्यात आले.

सहकार मंत्र्यांकडे अपील : प्रताप पाटील

जिल्हा बॅँकेच्या नुकसानीस आजी-माजी संचालक जबाबदार नाहीत. ही चौकशी चुकीची आहे. नोटीस मिळताच सहकार मंत्र्यांकडे अपील केले जाईल. ज्या प्रकरणात बॅँकेचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात संचालकांनी एकही रुपयांचा भ्रष्टाचार केलेला नाही. चौकशी अहवालातही तसे म्हटले आहे. त्याला संचालक जबाबदार ठरत नसल्याचे माजी संचालक प्रताप पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पुन्हा एकदा संकटाचा इशारा! शेतकऱ्यांनो काळजी घ्या.... मुंबईला एलो अलर्ट, पुण्यासह संपूर्ण राज्यात काय परिस्थिती?

Navratri 9th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग जांभळा, मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

Navratri Fast Recipe: नवरात्रीत नवव्या दिवशी सकाळी नाश्त्यात झटपट बनवा राजगिरा आणि साबुदाणा डोसा, लगेच नोट करा रेसिपी

Sakal Podcast: 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

अग्रलेख : नीतिमूल्यांचा ‘ताज’

SCROLL FOR NEXT