berojgari 
पश्चिम महाराष्ट्र

आता अवघड झाले....राज्यातील 93 लाख बेरोजगारांना मिळेना भत्ता

तात्या लांडगे

सोलापूर : सत्तेत आल्यास राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात पाच हजारांचा भत्ता अन्‌ बळीराजाला कर्जमुक्‍त करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. तत्कालीन सरकारच्या सर्व्हेनुसार राज्यात 93 लाख सुशिक्षित बेरोजगार असून भत्ता देण्यासाठी प्रत्येक महिन्याला चार हजार 164 कोटी रुपये आवश्‍यक आहेत. तर सातबारा कोरा करण्यासाठी सुमारे एक लाख कोटीची गरज आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दोन्ही आश्‍वासने अर्धवटच आहेत. या पार्श्‍वभूमीवर तीन लाख 50 हजार कोटींची महसूल सूट केंद्राने द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. 

अच्छे दिनचे स्वप्न दाखविताना मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचेही स्वप्न दाखविले. मात्र, 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये बेरोजगारांची संख्या सुमारे 38 लाखांनी वाढली असून सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, कोल्हापूर व पुण्यात सर्वाधिक बेरोजगार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कृषी क्षेत्रात दोन कोटी 80 लाख जणांना रोजगार उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश सुशिक्षित बेरोजगार सरकारी नोकरीचीच प्रतीक्षा करीत आहेत. चार-पाच वर्षांपासून नव्याने शासकीय नोकरी भरती नाही, आर्थिक मंदीमुळे खासगी क्षेत्रातील घटलेले रोजगार, या पार्श्‍वभूमीवर नव्या सरकारच्या वचननाम्यानुसार पाच हजारांचा भत्ता मिळेल, अशी त्यांना आशा आहे. बहुतांश बेरोजगारांनी डांबरीकरण, शेती, टोल नाका यासह अन्य ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणारी मेगाभरतीही आता थांबल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा हात पसरला आहे. केंद्राने राज्य सरकारला दोन वर्षांची महसूल सूट द्यावी, असा प्रस्ताव तयार केल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

राज्यात 83 लाख सुशिक्षित बेरोजगार 
राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात पाच हजारांचा भत्ता देण्याचे वचन शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेरोजगारांना बाजूला सारून सत्तेच्या माध्यमातून स्वत: रोजगार मिळवला. राज्यातील 83 लाख बेरोजगारांना भत्त्याची प्रतीक्षा असून मुख्यमंत्र्यांनी तो कधीपर्यंत मिळेल ते जाहीर करावे. 
- सुधीर मुनगुंटीवार, माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र 


राज्याची स्थिती 
सुशिक्षित बेरोजगार 
83.29 लाख 
भत्त्याची रक्‍कम (दरमहा) 
4,164 कोटी 
राज्याच्या डोक्‍यावरचे कर्ज 
सहा लाख 71 हजार कोटी 
केंद्राला महसूल सुटीचा प्रस्ताव 
तीन लाख 50 हजार कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT