Corona  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अधिकाऱ्यांना केंद्रातच थांबण्याचे आदेश

आरोग्य व कुटुंब’च्या आयुक्तांचा आदेश; कोविड-११९ संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोविड-१९ (Covid-19)आणि ओमिक्रॉनच्या (Omicron)पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी थांबण्याचे आदेश आहेत. वैद्यकीय उपचारासाठी एकीकडे पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासोबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना विनाअनुमती केंद्रस्थान न सोडण्याबाबत कळविले आहे. आपत्कालीन संदर्भात त्वरीत सेवा बजाविण्यात यावी. रजा, साप्ताहिक सुटीच्या दिवशी जबाबदारी दिल्यानंतर अल्पावधीत पूर्ण करण्यात यावी, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तांनी ७ जानेवारीला बजाविलेल्या आदेशात उल्लेख आहे.

कोविड-१९ (Covid-19)आणि यात ओमिक्रॉन (Omicron)बाधितांचे आकडे वाढत आहेत. पुढील सहा आठवड्यात ते चिंता वाढविणारे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी विविध पातळीवर व्यापक तयारी केली जात आहे. नियोजन केलेले आहे. सार्वनिजक कार्यक्रमांवर निर्बंध घालून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. याला जोडून प्रशासकीय पातळीवरही तयारी वेगात सुरु आहे. अधिकाऱ्यांना या कालावधीत तत्परता दाखविण्याचे आदेश आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तांनी ७ जानेवारीला बजावले आहे.(Belgaum news)

कोविड-१९ नियंत्रणामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिक खूप महत्वाचे आहे. या कालावधीत अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनी समर्पक सेवा बजाविणे अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थिती नियोजित वेळेत हाताळण्यासाठी बैठका आयोजित करण्यासोबत संसर्ग त्वरीत नियंत्रणाखाली कसा राहील, याचा अभ्यास केला जावा. शिवाय सध्याची भीषणस्थिती लक्षात घेतल्यास अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची गरज कधीही भासू शकते. यामुळे याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या जाव्यात. कोविड-१९ संसर्ग वाढत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या सूचना बजावतील, त्याची काटेकोर कार्यवाही केली जावी. कोणत्याही कारणांनी विनापरवानगी आरोग्य केंद्र सोडून जाऊ नये.

वरीष्ठांचे आदेश पाळा

आदेश वा सूचना बजाविल्यानंतर त्याला त्वरीत प्रतिसाद देण्यात यावे आणि कमी वेळेत दिलेली जबाबदारी पार पाडली जावी. आपत्कलीन परिस्थितीत रजेच्या दिवशी किंवा साप्ताहिक सुटी दिवशीही काम केले जावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT