organizing employment fair in belgium 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्ण संधी; येथे मिळणार रोजगार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहरात प्रथमच प्रादेशिक स्तरावर भव्य रोजगार मेळाव्याचे 28 व 29 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शिवबसनरातील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या या मेळाव्यात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी बुधवारी (ता.26) पत्रकार परिषदेत दिली. 
बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यासाठी प्रादेशिक स्तरावर होणाऱ्या या मेळाव्यात बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळणार आहे. बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण आदिंच्या सहकार्याने मेळावा होत आहे. दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, पीयूसी, आयटीआय, डिप्लोमा, कला-विज्ञान-वाणिज्य यापैकी कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त बेरोजगार उमेदवार, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 

आयटी-बीटी, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, मार्केटिंग, सेल्स ऍन्ड रिटेल, टेलिकॉम, बीपीओ, टेक्‍स्टाईल, बॅंकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, हॉस्पिटल्स, फार्मास्युटिकल्स, हेल्थकेअर, मॅनिफॅक्‍चरिंग, ट्रान्स्पोर्ट, होम नर्सिंग, आहार प्रक्रिया, गारमेंट्‌स, सिक्‍युरिटी आदी कंपन्यांचा मेळाव्यात समावेश असणार आहे. 
18 ते 35 वर्षे वयोगटातील पुरुष- महिला उमेदवार, दिव्यांगांना मेळाव्यात प्रवेश असणार आहे. संकेतस्थळावरून नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना मेळाव्यात प्रवेश देण्यात येईल. तसेचे मेळावा स्थळावर थेट आल्यास अशा उमेदवारांनाही प्रवेश देण्यात येईल. उमेदवारांनी सकाळी 8 वाजता मेळावा स्थळावर हजर राहणे आवश्‍यक आहे. या मेळाव्याता दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. www.belagaviudyogamela या संकेतस्थळावरून अजून नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. 

आतापर्यंत 120 कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून 7 हजाराहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. उमेदवारांचे शिक्षण व कंपन्यांची आवश्‍यकता यानुसार उमेदवारांना विविध वर्णातील प्रवेश पत्रिका देण्यात येतील. त्यानुसार उमेदवरांची कंपन्यांमार्फत मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्याप्रसंगी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वाहन पार्किंग यांची सुविधा देण्यात आली आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अदानींच्या घरी झालेल्या अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांनी सांगितली Inside Story...

Stock Market Crash: शेअर बाजारात पुन्हा भूकंप... सेन्सेक्स-निफ्टी कोसळले; अंबानीपासून अदानीपर्यंतच्या शेअर्समध्ये त्सुनामी

Sharad Pawar : शिवसेना शरद पवारांनीच फोडल्याचा छगन भुजबळांचा स्फोटक दावा; पवार यांनी दिले 'हे' प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates : सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश, शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरु नका

Sweater Care Tips: हिवाळ्यात स्वेटरचे नवेपण टिकवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT