Our Aim Now Gokul Remain Slogan On Buffalo Of Diwali Padwa competition  
पश्चिम महाराष्ट्र

पाडव्याला सजलेल्या म्हशी म्हणाल्या  "आमचं ठरलय, आता गोकुळ उरलय'

सुधाकर काशिद

कोल्हापूर - गोकुळचे राजकारण गल्ली बोळापर्यंत कसे येऊन ठेपले आहे, याचे प्रत्यंतर दिपावली पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या म्हशीं पूजन सोहळ्यात दिसून आले. दूध व्यवसायावर आधारित गोकुळच्या राजकारणावर सत्ता मिळवण्यासाठी विरोधी गटाचे सुरू असलेले प्रयत्न आज म्हशींच्या सजवण्यात ही दिसून आले. ,"आमचं ठरलय, आता गोकुळ उरलय' ही सत्तारूढ गटाला आव्हान देणारी घोषवाक्‍ये आज चक्क म्हशीच्या अंगावरही लिहिण्यात आली. 

गेल्या काही वर्षात कोल्हापुरातील चालू घडामोडीचा स्पर्श पाडवा सोहळ्यातून दिसून येतो. यावर्षी जिल्हा दूध संघा (गोकुळ) संदर्भातील भावना या सोहळ्यातून व्यक्त झाल्या. "गोकुळ' मधील कथित घोटाळ्यांची चर्चा नेहमीच होत असते. याचवरून गोकुळची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी विरोधी गटाचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या वर्षापासून गोकुळ मल्टीस्टेटचा विषय गाजतो आहे. मल्टीस्टेट ला विरोध करण्याचा निर्धार विरोधी गटाने केला आहे. गोकुळची गेल्यावर्षी ची सभा याच विषयावरून प्रचंड गाजली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही गोकुळच्या मुद्द्याला कळत नकळत हात घातला गेला. "आमचं ठरलय, दक्षिण घेतलय, आता गोकुळ उरलय' ही घोषवाक्‍य निवडणुकीच्या काळात खूप चर्चेला आली. 

आज पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूर व परिसरातील दुग्ध व्यवसायिक आपल्या म्हशींना मोरपिसे, फुलाच्या माळा, रंगाचे ठसे याच्या आधारे सजवतात आज मात्र काही दूध व्यवसायिकांनी आपल्या म्हशीवर "आता गोकुळ उरलय" ही घोषणा लिहून म्हशींना मिरवणुकीत आणले व व गोकुळ या धगधगत्या विषयावर सर्वांचे लक्ष वेधले. 

तत्कालीक विषयांना हात 

गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळीही म्हशी पूजनाच्या सोहळ्याची संधी काही उमेदवारांनी घेतली होती. त्यामुळे म्हशींच्या पाठीवर फक्त आण्णा, फक्त साहेब, फक्त दादा, फक्त वहिनीसाहेब अशा स्वरूपाची घोषवाक्‍ये लिहिली होती. टोल रद्द आंदोलनाच्या वेळी टोल रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा म्हशीच्या पाठीवर लिहिल्या होत्या. यावर्षी गोकुळ या विषयाला म्हशींच्या पाठीवर स्थान देण्यात आले आणि "आता गोकुळ उरलय' या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT