इस्लामपूर (जिल्हा सांगली) : कोरोनाकाळात दिवंगत झालेल्या कामगारांना पूर्ण वर्षाचा बोनस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने (Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory)आज जाहीर केला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चारही युनिटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १९ टक्के बोनस जाहीर करत असल्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील (P.R.Patil)यांनी सांगितले. बोनसची ही रक्कम ८ कोटी ६० लाख १८ हजार २४४ इतकी असून गुरुवारी (ता.२८) कामगारांच्या बँक खात्यावर ती वर्ग केली जाणार आहे. १९ टक्के बोनस जाहीर झाल्यानंतर कामगारांनी कारखाना कार्यस्थळावर साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला.
कोरोनाकाळात दिवंगत झालेल्या कामगारांना पूर्ण वर्षाचा बोनस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय.
आज कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोनसच्या चर्चेची बैठक झाली. या चर्चेत कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले,चीफ अकौंटंट अमोल पाटील,वाळवा तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील सहभागी झाले होते. हा बोनस सन २०२०-२१ साठी देण्यात येत असून साखराळे, वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी व तिप्पेहळळी (जत) या चारही युनिटमधील अधिकारी,कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना कामगारनेते शंकरराव भोसले म्हणाले, "कोरोनाचे संकट तसेच साखर उद्योग अनेक अडचणीतून वाटचाल करीत असतानाही जयंत पाटील, अध्यक्ष पी.आर.पाटील व व्यवस्थापनाने कामगारांच्यासाठी १९ टक्के बोनसचा चांगला निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व कामगार व कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. या निर्णयाने कामगारांच्यामध्ये नवे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.