Bhima River Bridge sakal
पश्चिम महाराष्ट्र

Bhima River Bridge : प्रवाशानां मोठा दिलासा,भीमा नदी पुलावरील खड्डे बुजवले

Bhima River Bridge : भीमा नदीवरील पुलावरील खड्डे बुजवले असून, दुरुस्तीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन पुलाच्या प्रस्तावाची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राशीन : राज्यातील महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला भीमा नदीच्या पात्रावरील पुलाच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली. या पुलावरील अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे बुजविण्याचे काम केले. या मार्गावरील प्रवासी आणि चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘भीमा नदीवरील पूल मोजतोय अंतिम घटका’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने गुरुवारी बातमी प्रसिध्द केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली. सुमारे ४५ वर्षे जुना असलेल्या या पुलावर अनेक वर्षांपासून मोठ-मोठ्ठे खड्डे पडले होते.

संरक्षक कठड्याचे सिमेंट निघून पडल्याने त्यातील गंजलेले लोखंड उघडे पडले आहे. सध्या पावसाचे पाणी पुलावरच्या खड्ड्यात साचल्याने पुलाला डबक्याचे स्वरूप आले होते. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने येथे सातत्याने अपघात होत होते. येथील खड्डे बुजवल्याने या गोष्टींना आळा बसेल.अहमदनगर, पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा जुन्या पुलावरून अवजड वाहने जाताना तो कंप पावत असल्याने येथून प्रवास करताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.

नवीन पुलासाठीचाप्रस्ताव पाठवा

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे केवळ डागडुजी करून न थांबता, राज्यमार्गावर आणि भीमा नदीवर असणाऱ्या या पुलाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून तो नव्याने करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास लवकर सादर करावा, अशी मागणी राशीनसह परिसरातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT