मलिकवाड - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीला घाबरू लागले असून, पराभवाची भीती वाटत आहे. काँग्रेस पक्ष वरचढ होत असल्याने त्यांनी एका दिवसात राज्यात नऊ ठिकाणी भाजपच्या प्रचारसभा घेतल्या आहेत. माझ्या ३९ वर्षांच्या राजकारणात पंतप्रधान बेळगाव जिल्ह्यात वस्तीला राहिलेले नाहीत.
आम्ही केवळ जनतेची सेवा केली असून, मतदार आमच्या पाठीशी आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले.
मलिकवाड येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
हुक्केरी म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील जनतेला गृहलक्ष्मी, अन्नभाग, मोफत वीज, शक्ती योजना, युवानिधी अशा पाच गॅरंटी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. राज्यातील जनता त्याचा लाभ घेत आहे.
येत्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना वर्षाला एक लाख रुपये, शेतीचे कर्जमाफ अशा आणखी योजना राबविण्यात येणार आहेत. जनतेच्या हितासाठी एकमेव काँग्रेस पक्ष अशा योजना राबवू शकतो. यापुढे मी व गणेश हुक्केरी यांनी भागाचा विकास साधण्यासाठी प्रियंकाना जास्तीतजास्त मताने निवडून द्यावे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, राजशेखर बाकळे, राजू मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक खोत, ए. डी. इंगळे, शमा जमादार, लक्ष्मी नडवीनमनी, अनिता लक्कोळे, गायत्री पाटील, शोभा पाटील यांच्यासह, महिला, नागरिक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.