पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कडेगांव : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदी (Narendra Modi) सरकारवर घणाघात केलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. देशाचं विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
मोदी सरकार देशात जातीयता व धर्मांधतेचं विष पेरत असून, देशाचं विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रा करीत आहेत. तेव्हा देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही, घटना, संविधान वाचविण्यासाठी व सर्वधर्म समभाव टिकविण्यासाठी 'भारत जोडो' यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) इथं भारत जोडो यात्राअंतर्गत कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या मेळाव्यात आमदार भाई जगताप, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. आम्ही विरोधीपक्षात आहोत, मग आम्ही मोदीचं कौतुक का करायचं असा सवालही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) म्हणाले, ‘राज्याला व देशाला लागलेले ग्रहण यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रेच्या मातीतून घालवायचं आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सर्वसामान्यांचे जगणं मुश्कील झालं आहे. यापासून जनतेची सुटका करण्यासाठी राहुल गांधींची दुसरी स्वातंत्र्य लढाई सुरू आहे.’ सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) म्हणाले, 'देशात आता जात व धर्म विचारला जात असून, स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर भारत एकत्र आला पाहिजे, माणसं एकत्र आली पाहिजेत. यासाठीच राहुल गांधी बाहेर पडले आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.