पश्चिम महाराष्ट्र

"या' जिल्ह्यात मुख्याध्यापकांना लवकरच पदोन्नती! 

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राठोड यांच्यासोबत बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी आश्‍वासन दिले. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे, जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत ही बैठक झाली. 

जिल्ह्यातील 100 टक्के शिक्षकांना 31 जानेवारीअखेर मराठी, हिंदी भाषा सूट मंजूर करण्याचे तसेच कन्नड व उर्दू माध्यमांच्या शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संबंधित शिक्षकांना सूट मंजूर करण्याचे आश्‍वासनही श्री. राठोड यांनी दिले. विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी, प्राथमिक शिक्षकांतून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नती, समाजशास्त्र नकार दिलेल्या शिक्षकांचे नकार मंजूर करून विज्ञान विषयशिक्षक नेमणूक, विज्ञान विषयशिक्षक नेमणूक देताना बीएस्सी, 12 वी विज्ञान शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे, अंशदान कपातीचा मागील हिशोब व लेखाशीर्ष दुरुस्त करून सदर रक्कम सुधारित लेखाशीर्षवर तत्काळ वर्ग करावी या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यातील अनेक प्रश्‍न तत्काळ सोडविण्याचे आश्‍वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचे सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले. 

वैद्यकीय देयक मंजुरीची कार्यपद्धती सुधारणा करणे, दोषमुक्त शिक्षकांना तातडीने पदस्थापना देण्यात यावी, पती-पत्नी आपसी बदली, शालेय पोषण आहार, थकीत वेतन व वैद्यकीय देयकास अनुदान उपलब्ध करून देणे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित पेन्शन मंजूर करणे, सेवापुस्तक पडताळणी कॅम्पचे आयोजन करणे, भविष्य निर्वाह निधी व अंशदान विवरणपत्रातील त्रुटी दुरुस्त करणे हे प्रश्‍न निकाली काढण्याबाबत चर्चा झाली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे, विकास उकिरडे, सुरेश पवार, राजन सावंत, चंद्रहास चोरमोले, रमेश खारे, रंगनाथ काकडे, सचिन लादे, राजेंद्र माने, सिद्धाराम करसुंडे, बाबासाहेब माने, शिवानंद बिराजदार, संतोष मठपती, काकासाहेब चव्हाण, आशिष चव्हाण, सिद्धाराम डोळ्ळे, मुरलीधर गोडसे, इस्माईल मुर्डी, बसवराज गुरव, सिद्रामय्या स्वामी, लक्ष्मीकांत मुन्नोळी, शरणप्पा फुलारी, कल्याणी गंगोंडा, सिद्धाराम बिराजदार, सुनील कोरे, भारत लवटे, राजकुमार व्हटकर, धर्मराज चवरे, कैलास काशीद, रामराजे ताकभाते, विठ्ठल ताटे, आदिनाथ देवकते, दयानंद चव्हाण उपस्थित होते. 

आमची मागणी मान्य करण्याचे आश्‍वासन 
31 जानेवारी 2020 अखेर रिक्त होणाऱ्या पदांवर पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने केली होती. ती मागणीही मान्य करत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांतून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया तातडीने राबविणार असल्याचे शिक्षणाधिकारी राठोड यांनी कबूल केले आहे. अनिल कादे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT