Sangli-Miraj Road esakal
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे पुलावरून एसटी, ट्रकसह सर्वच अवजड वाहतुकींना बंदी? पालकमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

रेल्वे पुलावरून (Railway Bridge) एसटी, ट्रकसह सर्वच अवजड वाहतूक बंदचा प्रस्ताव पुढे आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे विभागाने हा पूल अवजड वाहतुकीस धोकादायक असल्याचे कळवतानाच तो दुरुस्त केल्यानंतरही त्यावरून अवजड वाहतूक करता येणार नाही, असे कळवले आहे.

सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील (Sangli-Miraj Road) रेल्वे पुलावरून (Railway Bridge) एसटी, ट्रकसह सर्वच अवजड वाहतूक बंदचा प्रस्ताव पुढे आला आहे. पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्याचवेळी रेल्वेच्या अहवालानुसार, या पुलाची दुरुस्ती केली, तरी त्यावरून अवजड वाहतूक पुन्हा सुरू करता येणार नाही.

शिवाय, पाच ते सात वर्षांनंतर नवा पूल बांधावा लागेल. त्यामुळे एवढा गोंधळ करण्यापेक्षा आताच पूल पाडून नवा का बांधत नाही, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रेल्वे विभागासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत या पुलाच्या विषयावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘रेल्वे विभागाला आम्हाला पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आणि त्यासोबत एक पत्र दिले आहे.

त्यानुसार पुलावरून अवजड वाहतूक बंदची शिफारस केली आहे. तो निर्णय आता घ्यावा लागेल. कारण, पूल जीर्ण झाला आहे. हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. कर्नाटकच्या शेतमालाला सांगली बाजारपेठेशी तो जोडतो. त्यामुळे पर्यायी व्यवस्था सक्षम आहे का, हे तपासणीचे आदेश दिले आहेत. बैठकीत त्यावर निर्णय होईल आणि फक्त हलकी वाहने त्यावरून जातील, याबाबत आता फारशी शंका राहिलेली नाही.

महत्त्वाचा मुद्दा आहे, की रेल्वेच्या अहवालानुसार हा पूल दुरुस्त केला, तरी पुन्हा त्यावर अवजड वाहने नेता येणार नाहीत. मग, त्याचा उपयोग काय? या मार्गावर कायमस्वरुपी एसटी वाहतूक बंद करता येणार नाही. त्यामुळे हा पूल नवाच बांधणे, हा पर्याय असेल. त्यावरही बैठकीत चर्चा आणि निर्णय होईल.’

स्ट्रक्चरल ऑडिटचे निष्कर्ष

  • रेल्वेचा हा पूल ४० वर्षांहून अधिक जुना आहे. अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. सळ्या उघड्या पडल्याने आणि त्यांचा पाण्याशी संपर्क आल्याने त्या गंजल्या आहेत.

  • रेल्वे पुलाची अवस्था फार बिकट नसली, तरी त्यावरून अवजड वाहतूक करता येणार नाही. तो तूर्त हलकी वाहने नेण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचीही दुरुस्ती करावी लागेल.

  • पुलाची दुरुस्ती केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्षे त्यावरून वाहतूक सुरू ठेवता येईल. त्यानंतर नवा पूल बांधावा लागेल.

रेल्वे विभागाने हा पूल अवजड वाहतुकीस धोकादायक असल्याचे कळवतानाच तो दुरुस्त केल्यानंतरही त्यावरून अवजड वाहतूक करता येणार नाही, असे कळवले आहे. तसे असेल तर मग नवा पूलच बांधायला हवा, असे मी त्यांना सूचवले आहे. त्यावर बैठकीत चर्चा होईल.

-डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT