पश्चिम महाराष्ट्र

Pune Bangalore Highway: हजारो खड्ड्यांमुळे पुणे बंगळूर महामार्ग ब्लॉक; पोलिसांची भर पावसात शिकस्त!

Pune: रस्त्यावरून जाताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे ; महामार्ग पोलीस मात्र दिवसभरात टोलनाके,मालखेड फाटा,केदारागाव येथे पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

विजय लोहार

Pune Bangalore Highway Traffic : पुणे बंगळूर आशियाई महामार्ग मेगा ब्लॉक झाल्याने आशियायी महामार्गाची "पाणंद"रस्त्यापेक्षा बिकट अवस्था झाल्याचे चित्र वाहन चालकांना पाहायला मिळत आहे. वाघवाडी पासून कराड पर्यंत हजारो खड्डे पार करत वाहन चालकांना जावं लागत आहे.आज रात्री रविवारी ९ वाजेपर्यंत कराडच्या दिशेला वाहतूक ठप्प झाली होती.

तर कोल्हापूर च्या दिशेला केदारगाव जवळ येणाऱ्या रस्त्यावर ट्रक बंद पडल्यामुळे चार तास आशियाई महामार्ग ब्लॉक झाला.यात वाहनचालक व प्रवाशी यांचे अतोनात हाल झाले.महामार्ग प्रशासनाचे अधिकारी झोपा काढत आहेत.तर महामार्ग पोलीस मात्र दिवसभरात टोलनाके,मालखेड फाटा,केदारागाव येथे पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.वारंवार महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

याकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.रस्त्यावरून जाताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. (heavy Traffic on Pune Bangalore Highway due to Thousands of potholes )

आज रात्री रविवारी सात च्या सुमारास कराडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर हजारो खड्डे पडले आहेत यातून वाहन चालकांना खड्डे चुकवत आपली वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे हळूहळू जाणारी वाहने तसेच अनेक वाहनांची रेल चेल वाढल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वारंवार पाहायला मिळते.याला रस्ते कारणीभूत आहेत.अशा वाहतुकीच्या कोंडीत देखील महामार्ग पोलिसांचा पावत्या फाडण्याचा उद्योग सुरू असतो.पूर्वेला नेर्ले हद्दीत एक ट्रक बंद पडल्यामुळे केदारागाव पासून कासेगाव पर्यंत पाठीमागे चार किलोमीटर अंतरावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

यावेळी अनेक चार चाकी वाहनधारकांनी परिसरातील गावात जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या गाड्या वळवल्या.परंतु पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतातून निघालेली पाणी रस्त्यावर आल्यामुळे गावातील रस्त्यावर ही वाहने अडकलेली पाहायला मिळाली. तसेच ओढ्यावरती सुद्धा पाणी आल्यामुळे अनेक वाहनचालकांना कसरत करावी लागली.यावेळी कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी पावसाची तमा न बाळगता पोलीस,पोलीस मित्र व स्थानिकांच्या मदतीने बंद पडलेला ट्रक बाजूला करत वाट मोकळी करून दिली.

तब्बल चार तास वाहतुकीची कोंडी या कोंडीमध्ये अडकलेले अनेक प्रवासी, लहान मुले, वाहन चालक, अक्षरशा वैतागून गेले होते. महामार्गाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. हा आशियाई महामार्ग आहे की पाणंद रस्ता असा सवाल आहे. ठेकेदाराने खड्डे भरून घ्यावेत. रस्ते वाहतुकीला व्यवस्थित करून द्यावेत. अशी मागणी होत आहे.दुचाकी धारकांना देखील वाट काढणे अवघड झाले होते. ही परिस्थिती कायम आहे.मार्ग कधी निघणार असा संतप्त सवाल आहे.

महामार्गाची दुरवस्था पाहता शेतकरी व स्थानिक लोकांना शेती करताना नाकी नऊ आले आहेत.रस्ते व्यवस्थित करावेत.आधी वाहतुकी साठी रस्ते तयार करा.मगच महामार्गाचे काम सुरू करा.रस्ते व्यवस्थित न झाल्यास जनआंदोलन करु.

सतिश पाटील

माजी तंटामुक्त अध्यक्ष नेर्ले

महामार्ग पोलीस असतात तरी कुठे?

महामार्गावर अपघात होऊ द्या.अथवा खड्ड्यांची मालिका असू द्या. अथवा वाहन बंद पडू द्या महामार्ग पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचत नाहीत. स्थानिक कासेगाव पोलिसांना महामार्गाची झालेली वाहतूक कोंडी काढण्यातच मोठा वेळ जात असल्याचे चित्र आहे.हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.पावत्या फाडणाऱ्या महामार्ग पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT